विरार मधील धक्का दायक घटना,पैशाचा पाऊस पाडायचा विधी सांगून 4 महिलांवर बलात्कार

      (प्रतिनिधिक छाया चित्र )

पालघर जिल्ह्यात विरार येथे2 आरोपीने आपल्यात दैवीशक्ती असल्याचे सांगत पैशाचा पाऊस पाडायचा विधी करायचा म्हणून 4 महिलांवर केला बलात्कार
पालघर जिल्ह्यामध्ये विरार येथे दोन जणांनी आपल्यात दैवी शक्ती असल्याचे सांगत पैशाचा पाऊस पाडायचा विधी करायचा सांगून चार महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणात अर्नाला कोस्टल पोलिसांनी एका 26 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोघांना अटक करण्यात आली आहे.मॅथ्यू पंडियान आणि दिनेश देवरुखकर अशी बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या आरोपिंची नावं आहेत.
आरोपीनी पीडित महिलांना आमच्याकडे दैवीशक्ती आहे. दैवीशक्तीच्या जीवावर आम्ही पैशाचा पाऊस पाडतो. त्यासाठी विधी करावा लागतो.विधी केल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल आणि मग आम्ही तुम्हाला 260 कोटी रुपये देऊ असं सांगितलं. त्यानंतर या महिलेने आणखी 3 महिलांना सांगून विधिसाठी तयार केले.विधी करण्यासाठी या आरोपीनी प्रत्येक महिलेकडून 10 हजार रुपये घेतले.
पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी करायचा म्हणून 4 महिलांवर वारंवार बलात्कार
आरोपीनी विधीच्या नावाखाली या 4 महिलांवर वारंवार बलात्कार केला. विधी केल्यानंतर पैसे मिळतील असं या महिलांना आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांना कुठलेच पैसे मिळाले नाही.सदरील घटना जुलै व ऑगस्ट 2021 मध्ये घडली आहे. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर या चार पीडित महिला पैकी एकीने पुढे येऊन पोलिसात तक्रार दिली.या नंतर हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng