महाराष्ट्रात 24 तासात 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; एकट्या मुंबईत 2510 कोरोना रुग्ण


महाराष्ट्रात 24 तासात 3 हजार 900 नवे रुग्ण तर एकट्या मुंबईत 2510 रुग्ण आढळल्याने कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता 
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून 29 डिसेंबर रोजी 3 हजार 900 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबई मध्ये 2510 रुग्ण नव्याने आढळून आल्याने चिंता वाढत आहे.28 डिसेंबर रोजी राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 333 रुग्ण आढळून आले होते.यात एका कोरोना रुग्णचा मृत्यू देखील झाला होता.त्यामुळे राज्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे.यामुळे राज्याची तसेच आरोग्य विभागाची सुद्धा चिंता वाढली आहे. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यानी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील लोकं कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करीत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.या बाबतीत दुर्लक्ष केलं तर कोरोनाची संख्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात येतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देखील आपण मागे आहोत, त्याची गती वाढली पाहिजे आणि शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे असे राजेश टोपे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
20 डिसेंबर पर्यंत राज्यात पाचशे ते सहाशे ऍक्टिव्ह रुग्ण होते मात्र आता 11हजार 492 रुग्ण आहेत.अशीच वाढ होत राहिली तर 20 हजारापर्यंत आकडा जाऊ शकतो. मुंबई त 300 च्या जवळपास केसेस असायच्या परंतु आता 1300 पर्यंत पोहचल्या आहेत. आज 2200 पर्यंत केसेसचा रिपोर्ट येईल. सात दिवसात सात पटीने तर दोन दिवसात दुपटीने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
रोज 400 ते 600 ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद होत होती आता मात्र ती 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे अशी सध्याची परिस्थिती आहे.

मुंबईत रोज 51 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत त्यात जर 2200 पॉसिटीव्ह येत असतील तर हा 4 टक्के पॉसिटीव्हिटी रेट असून हा आपल्या साठी चांगला नाही. त्यासाठी काळजी घेणं हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे असे देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेतील. आणि राज्यात कडक निर्बंध लागू करण्यासाबंधीचा निर्णय टास्क फोर्सचे मत विचारत घेतल्या नंतर घेण्यात येईल.
Previous
Next Post »