ब्रेकिंग न्यूज! मुंबई मध्ये 7 जानेवारीपर्यंत जमाव बंदी लागू ; 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई

    मुंबई पोलीस कलम144 लागू (प्रतिनिधिक चित्र :     सौजन्य पीटीआय )
मुंबईत झपाटाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे जमाव बंदीचा आदेश लागू 
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल बुधवारी एकाच दिवशी 2 हजार 510 रुग्णांची नोंद झाल्याने सरकारने तातडीचा निर्णय घेऊन आज सकाळी मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू केल्याची घोषणा केली आहे. हा जमाव बंदीचा आदेश आज पासून 7 जानेवारी पर्यंत लागू करण्यात आला आहे.

जमाव बंदीचा आदेश लागू झाल्याने मुंबई मध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे नविन वर्षाच्या निमित्ताने खुल्या मैदानात किंवा सर्वनिक ठिकाणी किंवा बंदिस्त ठिकाणी पार्ट्या किंवा स्नेहसमारंभ साजरे करता येणार नाहीत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या मध्ये विर्जन पडलं आहे. सार्वजनिक उत्सव, तसेच लग्न समारंभ किंवा अन्य कोणत्या ही कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी असल्यामुळे या कालावधी दरम्यान करता कोणतेच कार्यक्रम घेता येणार नाहीत.
मुंबई शहरातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे सार्वजनिक उत्सव, मेजवानी या वर बंदी आणल्या नंतर आता हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट, बार, क्लब, रिसॉर्ट आणि पब या ठिकाणी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खुल्या किंवा बंदिस्त कुठल्याही पार्ट्या आयोजित करता येणार नाहीत.

जमाव बंदीचा हा आदेश आज 30 डिसेंबर 2021 च्या मध्ये रात्री बारापासून ते 7 जानेवारीच्या मध्ये रात्री बारा पर्यंत लागू करण्यात आला असून बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व जागावर लागू असेल,"  असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.तसेच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर इंडिया पिनल कोड 1860 च्या कलम 188 अंतर्गत शिक्षेस पात्र राहतील.याच बरोबर महामारी कायदा 1857 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतरही कायद्यानंतर्गत कार्यवाही करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
Previous
Next Post »