डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची इंस्टाग्राम वरून बदनामी ; समाज कंठकाविरोधात गुन्हा दाखल, सायबर सेलकडून आयडी ब्लॉक


डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम व ख्रिश्चन धर्मविषयी इंस्टाग्राम वर बदनामी कारक लिखाण करणाऱ्या समाज कंठकाविरोधात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल
औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे इंस्टाग्रामवर आक्षेपहार्य लिखाण करणाऱ्या समाज कंठकाविरोधात गुन्हा दाखल.अनिल वाहूळ यांनी दिलेल्या तक्रारी वरून जवाहर नगर पोलीस ठाण्यात 23 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता कलम 153 अ (1),295 अ,298,505 (2),66 क आणि 67 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी आहे कि अनिल वाहूळ वय 23 वर्ष राहणार इंदिरा नगर गारखेडा, औरंगाबाद यांची इंस्टाग्राम या सोसिअल ऍप्प वर ravan 358 या नावाने आयडी असून दिनांक 21 रोजी दुपारी 1 वाजता इंस्टाग्राम चालू केलं असता होम पेजवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बदनामी करणारं आक्षेपहार्य लिखाण केल्याचं दिसून आलं.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो मर्फ करून अश्लील व प्राण्यासोबत दाखविण्यात आले. तसचे मुस्लिम व ख्रिश्चन धर्मविषयी देखील असेच आक्षेपहार्य फोटो व लिखाण आढळून आले.
इंस्टाग्रामवर त्याची प्रोफाइल आयडी चेक केली असता त्यावर पंडित बी एन राऊ (pandit_ bnrau)असे नाव होते.अनिल वाहूळ यांनी त्याच्याशी चाट करून विचारले असता त्याने तुला काय करायचे ते करून घे असं उत्तर दिले. त्यानंतर आणि यांनी त्याला मोबाईल नंबर मागितला असता त्यानेच अनिल वाहूळ यांचा मोबाईल नंबर मागितला अनिल यांनी त्याला मोबाईल नंबर दिल्यावर त्याने 6397324399 या मोबाईल नंबर वरून कॉल केला तेव्हा त्याला विचारले कि तू असे बदनामी कारक फोटो का टाकले त्यावर त्याने अनिल वाहूळ यांना जातीवाचक शिवीगाळ करून तुला काय करायचे ते करून घे मी गुजरातला राहतो असे सांगितले.
जवाहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्याशी या प्रकरणी माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त यांच्याशी रात्री 9 वाजता बैठक झाली.त्यानंतर रात्री 1 वाजेच्या सुमारास जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली.पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन सायबर सेल मदतीने त्या इंस्टाग्राम आयडी वरून आक्षेपहार्य मजकूर व फोटो नाहीसे करण्यात आले व आयडी बंद करण्यात आला. या वेळी इंदिरानगर परिसरातील भीमसैनिक तसेच बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे उपस्थित होते.
Previous
Next Post »