मुंबई :परंबीर सिंग आणि अन्य दोन पोलीस अधिकारी यांच्या विरोधात सक्तीची वसुली केल्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या प्रकरणी सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी सीआयडीने दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही अधिकारी अगोदर गुन्हे अन्वेक्षण विभागात कार्यरत होते.
या संबंधी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे की अटक झालेल्या या दोन अधिकाऱ्या पैकी एक पोलीस अधीक्षक नंदकुमार गोपाले हे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात पदावर आहे तर पोलीस निरीक्षक अशा कोरके नैगाव येथे पदावर आहेत.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार रिअल स्टेट व्यावसायिक शामसुंदर अग्रवाल यांनी या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सक्तीची वसुली करत असल्या प्रकरणी 22 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी एफआयआर मध्ये परंबीर सिंग समेत सात जनाचा समावेश आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon