परभणीत नानल पेठ पोलिसांची मोठी कार्यवाही, सहाय्यक पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शन खालील पथकाने अवैध वाहतूक करणारी दोन टिप्पर केले जप्त
परभणी :परभणी शहरात अवैध वाळू वाहतूक मोठ्याप्रमाणात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परभणीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या पथकाने शनिवारी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर धार रोड परिसरात पकडे आहेत.ही कार्यवाही नानापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली आहे.पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत दहा लाख सत्तरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या नेतृवा खालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, पोलीस कर्मचारी राजेश जटाळ, शेख ताजोद्दीन, विकास जोंधळे,शिवाजी काळे यांनी ही कार्यवाही केली.पोलीस पथक अवैध धंद्यासंबंधी माहिती घेण्यासाठी नानल पेठ पोलीस स्टेशन च्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान धार रोड परिसरात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पथकाने वाहने अडवून वाहनाची तपासणी सुरु केली असता वाळूची अवैध करणारे 2 टिप्पर पकडण्यात आले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी सय्यद अझहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप भगवान उर्फ बबन कांबळे, राजेभाऊ शांतीराम कुसळे तसेच वाहन (क्र. एम एच 15 -1367) चे चालक -मालक यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत 17 हजार 500 रुपये किंमतीची वाळू आणि 10 लाख रुपये किमतीचे दोन वाहने जप्त कारणात आली आहेत . या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर टिप्पलवाड करीत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon