केंद्र सरकारने इंधन दरात कपात केली, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला इंधन दर कपात करून दिलासा द्यावा
केंद्र सरकारने इंधन दरात कपात करून देशातील जनतेला दिवाळी भेट देऊन काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळाला आहे. केंद्र सरकारने केलेली इंधन दर कपात हा भ्रमाचा भोपळा असला तरी देशातील जनतेला काही प्रमाणात आर्थिक भार कमी होणार आहे. केंद्र सरकारने अगोदर इंधन दरात वारेमाप भाव वाढ केली.वाढलेल्या इंधन दराने देशातील जनता त्रस्त झाली होती. त्याचा परिणाम नुकत्याच पारपडलेल्या देशातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालातून दिसून आला आहे.
पोट निवडणुकीत भाजपाची झालेले हार लक्षात घेऊन केंद्र सरकारने इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भाजपा शासित राज्यातही इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पोट निवडणुकीच्या निकाला नंतर घेतला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुढील वर्षी होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. पोट निवडणुकीत झालेली भाजपाची हार लक्षात घेऊन सावध भूमिका म्हणून हा निर्णय घेतला आहे. महागाईच्या मुद्द्यावर येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला फटका बसेल या भीतीने हे सावध पाऊल केंद्रातील मोदी सरकारने टाकलं आहे
मुळात ही दिवाळी भेट वगैरे काही नाही देशातील जनतेची एवढी काळजी असती तर अशा प्रकारची वारेमाप इंधन दर वाढ केली नसती. जनतेला आर्थिक टंचाईच्या खाईत लोटले नसते. आता अचानक इंधन दर कपात करण्यामागचा हेतू म्हणजे पोटनिवडणुकीत भाजपाला मिळालेली हार. येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या रोषाला बळी पडू नये म्हणून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मोदी सरकारने इंधन दर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारने सुद्धा इंधन व इतर अत्य आवश्यक जिवन वस्तू वरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा. दिवसेंदिवस वाढत जाणारी बेरोजगारी, अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचे झालेले अतोनात नुकसान आणि त्यात एवढी महागाई हे सर्वसामान्य जनतेला सहन न होणारे आहे.राजा हा प्रजेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी असतो म्हणून महाविकास आघाडी सरकार चे प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या कल्यानाचा निर्णय घ्यावा. पेट्रोल डिझेल खाद्य तेल व इतर जिवन आवश्यक वास्तुवरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा हिचं जनतेची अपेक्षा आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon