वसईत 12 मजली इमारतीला आग लागली, अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली, कुठली ही जिवीत हानी नाही
वसई :वसई मध्ये वसई वन नावाच्या 12 मजली निवासी इमारतीला काल दुपारी आग लागली होती. अग्निशमन दलाने आगीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. इमारतीच्या 9 व्या मजल्यावर एक वृद्ध महिला अडकली होती तिला पण अग्निशमन दलाने सुख रूप बाहेर काढलं.इमारतीच्या आठव्या माजल्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र या दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
वसईच्या पश्चिमेस असलेल्या अंबाडी रोड वर 'वसई वन' नावाने दोन निवासी इमारती आहेत. त्यातील एक 7 मजली तर दुसरी 12 मजली इमारत आहे. शुक्रवारी दुपारी 12 मजली असलेल्या इमारतीतील पॅसेज मध्ये अचानक आग लागली होती. वसई विरार अग्निशमन दलाच्या पथकाने ताबडतोब आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे आटोक्यात आणली दरम्यान एक वृद्ध महिला 9 व्या मजल्यावर अडकली होती तिलाही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही मात्र इमारतीच्या आठव्या मजल्याचे मोठ्याप्रमात नुकसान झाले आहे.
इमारतीला शॉट सर्किट मुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.विद्युत पुरवठा करणाऱ्या तारामध्ये काही दोष आहे का हे तपासले जाणार असल्याचे अग्निशमन दलाचे वसई विरार महापालिका विभागाचे प्रमुख दिलीप पालव यांनी म्हटले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon