गुजरातमधील एका गुटखा वितरकाच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत 100 कोटीचं घबाड सापडले असून आयकर अधिकारीही आवाक झाले आहेत
गुजरात :गुजरातमधील एका गुटखा वितरकच्या संबंधित ठिकाणावर आयकर विभागाने 16 नोव्हेंबर रोजी वेगवेल्या पंधरा ठिकाणी धाडी टाकल्या होत्या त्या छापेमारी दरम्यान जे वास्तव समोर आलं हे पाहून प्राप्तीकर अधिकारी आवाक झाले. या धाडीत आयकर विभागाला 100 कोटीची मालमत्तेचे घबाड सापडले असल्यामुळे आयकर अधिकारीही हैराण झाले आहेत.
या समबंधितीची माहिती सरकारकडून देण्यात आली असून संबंधित गुटखा वितरकाचे नाव मात्र जाहीर करण्यात आले नाही.
या धाडी दरम्यान आयकर विभागाला साडेसात कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली असून चार कोटींचे दागिने सापडले आहेत.तसेच कंपनीकडे तीस कोटींची मालमत्ता असल्याची कबुली दिली असल्याची माहिती सरकारच्यावातीने देण्यात आली आहे.या कार्यवाही दरम्यान अनेक महत्वाचे कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे प्राप्तीकर विभागाला मिळाले असल्याचे सरकारकडून सांगितले आहे.सापडलेल्या पुराव्यावरून मोठ्याप्रमाणात कंपनीने कर चोरी केल्याचे उघड झाले आहे.
आयकर विभागाकडून प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार तपासदरम्यान जवळपास 100 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता सापडल्याचे समोर आले असून कंपनीने आतापर्यंत तीस कोटींच्या मालमत्ते संबंधित कबुली दिली आहे.
तपासमध्ये कंपनीने अनेक व्यवहार बँक खात्यावर दाखवले नाहीत तसेल कंपनीने अनेक स्थायी संपत्तीमध्ये गुंतवणूक केल्याचे कागदोपत्री पुरावे सापडले असल्याची माहिती सरकारच्या वतीने दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon