महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडी कडून अटक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले होते,12 तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कडून अटक करण्यात आली.
शंभर कोटी वसुलीच्या आरोपा नंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीकडून आता पर्यंत पाच समन्स पाठवले होते तरीही मागील अनेक दिवसापासून अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते.काल सोमवारी अचानक अनिल देशमुख हे आपल्या वकिलासोबत ईडी कार्यालयात हजर झाले. तिथे ईडीकडून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. महिन्याला शंभर कोटीची वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांची तब्बल 12 तास कसून चौकशी करण्यात आली.

 चौकशी नंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांना मंगळवारी 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Previous
Next Post »