परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा येथे दोन दुचाकीचा अपघातात दोन जन जागीच ठार मृता मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे
परभणी :परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा परिसरात आज सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघात दोघे जन जागीच ठार झाले आहेत.या अपघातात दैठाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी रामा कदम व अन्य गंगाधर गायकवाड हे दोघे ठार झाले आहेत.
पोलीस कर्मचारी रामा कदम दैठणा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.दुचाकीवरून ड्युटी वर जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली.सदरील घटना सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास दैठणा पोलीस करत आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon