हातबॉम्बच्या मदतीने वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीतील तीन जन ताब्यात तर दोघे फरार
सातारा :सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात भोसगाव येथे वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागाने सापळा रचून पकडलं आहे. या टोळीतील तिघांना पकडण्यात आले आहे. या कार्यवाहीत टोळीकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे सहा हातबॉम्ब आणि दोन मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.असून या शिकारी टोळीतील आणखी दोघे फरार झाले असल्याची माहिती वनविभागाकडून दिली आहे. या दरम्यान दोन रान डुकरे देखील मृत अवस्थेत पडलेले आढळून आले आहेत.
वनविभाने केलेल्या या कार्यवाहीत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून शिकारीसाठी वापरण्यात येणारे 6 हातबॉम्ब देखील या तिघांकडून हस्तग करण्यात आले आहेत. आणखी हातबॉम्ब सापडण्याची दाट शक्यता असून त्या दिशेने तपास चालू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.या कार्यवाही दरम्यान दोघे फरार झाले असून आणखी लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.त्यांचा देखील शोध घेणं चालू आहे.
या कार्यवाही दरम्यान अजय कोळी (रा.कराड )महेश मंडले व उमेश मदने दोघेही (रा.दुधोंडी ता.पलूस.जि सांगली )यांना पकडण्यात वनविभागा यश आले आहे तर आणखी दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत.पसार झालेल्यांचा कसून शोध घेतला जात आहे. सदरील कार्यवाही वनविभागाचे उप वनसंरक्षक एम एन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon