आजची मोठी बातमी "फेसबुक"ने केला नावात बदल ;मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा

फेसबुकच्या नावात बदल करण्यात आल्याची घोषणा झुकरबर्ग यांनी केली असून फेसबुक च्या लोगो ही बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
फेसबुक हे जगातील सर्वात मोठी सोसिअल नेटवर्किंग असलेली कंपनी आहे.या कंपनीने आपल्या नावात बदल करण्याची घोषणा केली आहे.कंपनीच्या रिब्रॅण्डिंगच्या उद्देशाने नावात बदल करण्यात आल्याची घोषणा कंपनी चे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे.कंपनीच्या वार्षिक सभेत बोलताना कंपनी जे आतापर्यंत काम करते ती फेसबुक या नावाखाली. परंतु आता हे नाव योग्य वाटत नाही त्यामुळे आता मूळ कंपनीचं नाव बदलन्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे मालक झुकरबर्ग यानी म्हटलं आहे.आपण आता मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करून वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी फेसबुकच्या नावात बदल करत आहोत.आता यानंतर फेसबुकचं नविन नाव 'मेटा' असं असेल अशी घोषणा केली आहे.

मेटाव्हर्स म्हणजे व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका आहे.इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वात भ्रमण करत असतात त्याला मेटा व्हर्स असे म्हणतात. व्हर्चूअल वास्तविकता आणि अगमेंटेट वास्तविक्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आभासी विश्व.या आभासी विश्वाला डिजिटल स्पेस असं म्हटल्या जाते. स्क्रीनवर टाईपची सुरुवात करण्यापासून आज आपण मोबाईल पर्यंत आलो आहोत.आम्ही आता पर्यंत जे काम करतोय ते फेसबुक हे नाव पुरेसं आणि योग्य वाटत नाही.म्हणूनच आता यापुढे मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत असं झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे.

फेसबुक या ब्रँडखाली सद्या अनेक उप कंपन्या आहेत.
या उपकंपन्या मध्ये विशेष करून फेसबुक,इंस्टाग्राम,व्हाट्सअप ऑक्यूलस आणि इतर काही कंपन्यांचा समावेश आहे.फेसबुक चे नामकरण करत असताना सध्या चालू असलेल्या सेवांची व ऍप्पची नावं बदली जाणार नसल्याचे झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे.या कंपनीच्या नावात झालेला बदल हा पूर्ण पणे व्यवसायिक बदल असून वापर कर्त्यावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.यापुढे आम्ही सर्व कारभार फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटा फर्स्ट भूमिकेतून करणार असल्याचे झुकरबर्ग यांनी फेसबुक वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
फेसबुकच्या नावासोबत कंपनीच्या लोगो मध्ये ही बदल केला आहे.या पुढे फेसबुकचं चिन्ह 'एफ' ऐवजी इन्फिन्टी चं चिन्ह हा कंपनीचा लोगो असेल.या लोगो मधून आणि नावामधून फेसबुकने माहिती तंत्र ज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि संशोधन यापुढे याच ब्रँडनावाखाली केलं जाणार असल्याची माहिती दिली आहे.

मेटा या ब्रँड नावांतर्गत प्रामुख्याने दोन गोष्टीत काम केलं जाईल. पहिले म्हणजे सध्या ज्या सेवा पूर्वील्या जातात त्यांचं आणि दुसरं म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधन यासंबंधी असणार असल्याचे म्हटले आहे.
Previous
Next Post »