पश्चिम बंगालमध्ये बिकानेर रेलएक्सप्रेसचा अपघात ; 8 प्रवाशांचा मृत्यू , 50 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी



पश्चिम बंगाल मधील जयपाल गुडी जिल्ह्यात बिकानेर-गुहाटी एक्सप्रेस गाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा अधिक प्रवाशी जख्मी झाले अहेत 
जयपालगुडी : पश्चिम बंगालमधील जयपाल गुडी जिल्ह्यातील दोहोमोनीजवळ गुरुवारी बिकानेर रेल्वे एक्सप्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 9 जनांचा मृत्यू झाला आहे तर 50 जन गंभीर जखमी झाले अहेत.या अपघातात मृत्यूचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिकानेर कडून गुहाटीकडे जाणाऱ्या बिकानेर-गुहाटी एक्सप्रेस गाडीचे 12 डब्बे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. डब्ब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशीरा पर्यंत प्रशासनाच्यावतीने करण्यात येत होते. परंतु रात्रीची वेळ असल्याने अंधारातून प्रवाशांना बाहेर काढताना अडचणीचा सामना करावा लागत होता.घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी व वैद्यकीय पथक दाखल झालेलं असून प्रवाशांना वाचवण्यासाठी मदत कार्य चालू आहे.
Previous
Next Post »