एसटी कृतीसमितीने काम बंद आंदोलन मागे घेण्याचे जाहिर करूनही काही जिल्ह्यात अजून आंदोलन चालूच, प्रवाशांना करावलागत आहे अडचणीचा सामना
राज्यात एसटी कर्मचारी संघटनाकडून विविध मागण्याच्या संबंधाने काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. काल आंदोलन सुरु झाले त्यानंतर एसटी महामंडळकृती समिती आणि परिवन मंत्री अनिल परब यांच्यात बुधवारी बैठक होऊन काही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या आणि उर्वरित मागण्याच्या बाबतीत दिवाळी नंतर निर्णय घेण्यात येईल असं मंडळाच्यावतीने आश्वासन दिल्याने एसटी कर्मचारी कृती समितीने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केलं होतं. परंतु या निर्णयावर काही कर्मचारी अजूनही नाराज असल्याचे दिसून आले आहे.
एसटी कर्मचारी कृतिसमिती आणि कर्मचाऱ्यात समन्वय नाही
एसटी कर्मचारी कृतीसमितीने आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले असले तरी काही जिल्ह्यात आंदोलन अजून सुरूच आहे.कृती समितीने घेतलेल्या निर्णयावर कर्मचारी नाराज आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये कर्मचाऱ्याने आत्म हत्या केल्याने कर्मचाऱ्यामध्ये आणखी संताप निर्माण झाला आहे. आंदोलन आणखी तीव्र झाले आहे त्यामुळे आजही एसटी सेवा सुरळीत झाली नाही.सोलापूर, कोल्हापूर बीड आणि धुळे जिल्ह्यात आंदोलन तीव्र करण्यात आले आहे यामुळे आज ही एसटी सेवा सुरळीत झाली नाही. याचा फटका नाहक एसटी प्रवाशांना बसला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon