बहुचर्चित मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण धवळून निघाले होते. महाविकास आघाडीतील मंत्री आणि एनसीबीचे विभागीय संचालक यांच्यात आर्यन खान ड्रग्स प्रकरणी आरोप प्रत्यारोप झाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सुद्धा या प्रकरणासंबंधी अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. आज आर्यनचे वकील रोहतगी यांनी आर्यन खानला जामीन मिळवून दिला आहे.
ऍड. रोहतगी यांनी सांगितले की आर्यनला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान सोबत अटकेत असलेले अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.उद्या किंवा परवा तिघांनाही जेल मधून सोडले जाईल असे रोहतगी यांनी म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon