मायावतीना धक्का!बीएसपीच्या सहा आमदारांनी समाजवादी पक्षात केला प्रवेश

बहुजन समाज पक्षाच्या 6 आमदारासोबत भाजपाच्याही एका आमदाराने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे
उत्तर प्रदेशात काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याअगोदर राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे.काल शनिवारी बसपाच्या सहा बंडखोर आमदारांनी समाजवाजी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाच्या लखनऊ येथील मुख्य कार्यालयात अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बसपाच्या सहा तर भाजपाच्या एका आमदाराने पक्षात प्रवेश करून सदस्यता घेतली.

 बसपाच्या सहा बंडखोर आमदारामध्ये सुषमा पटेल, हरगोविंद भार्गव,असलम चौधरी, असलम राईनी,हकीम लाल बिंद व मुजताब सिद्दीकी यांचा समावेश आहे तर भाजपाच्या राकेश राठोर या बंड खोर आमदाराने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.बसपाच्या सहा बंडखोर आमदारांनी सपा मध्ये प्रवेश केल्याने बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या अगोदर बसपाच्या अकरा आमदारांनी पक्ष सोडला होता.2017च्या विधानसभा निवडणुकीत 19 आमदार निवडून आले होते. त्यातील आतापर्यंत 17 आमदारांनी बहुजन समाज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

अखिलेश यादव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर सडकून टिका केली आहे. भाजपाच्या एका आमदाराने सपामध्ये प्रवेश केल्याने मुख्यमंत्री आपला  आपला नारा बदलतील."माझा परिवार भाजपा परिवार" ऐवजी 'मेरा परिवार भगता परिवार' असा नारा ठेवतील असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणले की भाजपाने दिलेल्या वचन नाम्यातील आश्वासनाची कुठलीही पूर्तता केली नाही.समाजवादी पक्षाचे मत आहे जी काँग्रेस आहे तीच भाजपा आहे आणि जी भाजपा आहे तीच काँग्रेस आहे असं देखील अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत बोलता म्हटलं आहे.
Previous
Next Post »