भिवंडीत शेजाऱ्यावर चाकू हल्ला ;दोघांचा मृत्यू, चार जन जखमी

ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहर परिसरात शेजाऱ्याने केलेल्या चाकू हल्ल्यात 2 जनाचा मृत्यू तर चार जन जखमी
ठाणे : ठाणे मधील भिवंडी शहर परिसरात काल शुक्रवारी शेजाऱ्यानेच एका कटुंबावर चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर एकाच कुटुंबातील अन्य चार जन जखमी झाले आहेत.जखमी मध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गैबी नगरात घडली असून आरोपी मोहम्मद अन्सारुल हक लुकमान अन्सारी (45 वर्ष )याला अटक करण्यात आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणात हा भयंकार प्रकार घडला आहे.

या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता अनुसार तथा बाल न्याय अधिनियम संबंधित कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कमरूज्मा अन्सारी वय वर्ष 42 आणि इम्तियाज मोहम्मद वय वर्ष 35 या दोघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.मृत कमरूज्मा अन्सारी यांच्या परिवारातील तीन  मुलांना व अन्य जखमीना उपचारासाठी दवाखान्याय भरती करण्यात आले आहे

काही दिवसापूर्वी कमरूज्मा अन्सारी आणि एक जखमी महिला या दोघींनी आरोपीच्या बद्दल वाईट टिका टिप्पणी केली होती याचा राग मनात धरून आरोपीने काल शुक्रवारी सकाळी आपल्या दारासमोर उभे असलेल्या कमरूज्मा अन्सारी यांच्या वर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कमरूज्मा अन्सारी यांना वाचविण्यासाठी आलेल्या इम्तियाज खान याच्यावरही चाकू हल्ला केला. या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.या हल्ल्यात सोडविण्यासाठी आलेल्या कमरूज्मा अन्सारी यांच्या परिवारातील तीन सदस्यावर चाकू हल्ला केला त्यात ते गंबीर जखमी झाले आहेत.

या घटने मुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा, सुव्यवस्था व शांतता या कारणासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Previous
Next Post »