देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या मूलभूत मुद्यावरून लक्ष हटवाण्यासाठी आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला हवा दिली जात आहे?

देशात व राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई,वाढती बेरोजगारी, अतिवृष्टीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान या जनतेच्या मूलभूत समस्यावरून लक्ष हटविण्यासाठी आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला महत्व दिलं जात आहे
2 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रूझ वरील ड्रग्स पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे आणि विक्री प्रकरणी एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणात आर्यन खानला अजूनही जमीन मिळालेला नाही.हे प्रकरण हाताळणारे एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि आघाडी सरकारमधील मंत्री यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना आपण पहात आहोत.

एनसीबीचे समीर वानखेडे यांनी आर्यन खान वर केलेली कार्यवाही बनावट आहे का?
आर्यन खान ड्रग्स पार्टी प्रकरणी महाविकास आघाडीतील काही नेते आणि मंत्री यांनी शंका निर्माण केली आहे. एनसीबी कडून हे प्रकरण हाताळणारे विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे केंद्र सरकारच्या ईशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या विल्यभोपळ्याचे वैर असल्यासारखे दिसत आहे. दोघे ही या प्रकरणात वयक्तिक पातळीवर आरोप प्रत्यारोप करून एकमेकांविरुद्ध पुरावे सादर करत आहेत.

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला हवा दिली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.परंतु समीर वानखेडे यांनी केलेली कार्यवाही खरी आहे की खोटी आहे.या प्रकरणात मुद्दामआर्यन खानला अडकवलं जाते का हेही सिद्ध होईल. या प्रकरणात खरोखर जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर तर नियमाने कार्यवाही होणारच यात शंका नाही.परंतु या प्रकरणाला एवढी प्रसिद्धी का दिली जाते. या प्रकरणाशिवाय देशात व राज्यात जनतेच्या समस्या सोडवण्या संबंधी शासन आणि प्रशासन यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत का?.
आर्यन खान ड्रग्स प्रकरण एवढं गंभीर असेल तर गुजरात मध्ये अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो ड्रग्स सापडलं त्याचे काय?
गुजरात मध्ये अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेलं 3 हजार किलो ड्रग्स प्रकरण केंद्र सरकारच्या दृष्टीने गंभीर नाही का?
मुंबई क्रूझ वरील ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खान याचा तपास ज्या वेगाने केला जात आहे आणि संबंधितावर  कार्यवाही सुद्धा केली जात आहे. त्या तुलनेत गुजरात मधील अदानी बंदरावर सापडलेल्या 3 हजार किलो ड्रग्स संबंधी तपास आणि कार्यवाही काय केली आहे. या बाबतीत कुठेच वाच्यता नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहे या विषयी भाजपचे नेते मंडळी कोणी बोलायला तयार नाही. कुठला मीडिया सुद्धा या विषयी सरकारच्या भूमिकेविषयी बोलायला तयार नाही. परंतु मुंबईतील आर्यन खान ड्रग्स प्रकरणी क्षणा क्षणाची माहिती मीडिया कडून दिली जात आहे.

देशात व राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवायच्या सोडून दिलं 0आणि ज्या प्रकरणात देशाचे आणि राज्याचे कुठलेच हित होणार नाही त्या विषयी केंद्र सरकार व राज्य सरकार लक्ष घालत आहे.जनतेच्या मूलभूत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी या प्रकरणाला हवा दिली जात आहे हे मात्र नक्की आहे.

Previous
Next Post »