पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सीएनजी, आणि खाद्य तेलाच्या भाव वाढीच्या विरोधात बीआरएसपीच्या वतीने औरंगाबाद मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.
औरंगाबाद : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ सुरेश माने यांच्या आदेशानुसार पेट्रोल डिझेल सीएनजी, घरगुती गॅस, खाद्य तेल व जिवन आवश्यक वस्तू यांच्या दरात वारेमाप झालेल्या भाव वाढीच्या विरोधात आज 25 ऑक्टोबर 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी औरंगाबाद जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यात आले असून मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या औरंगाबाद येथे महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. जिवन आवश्यक सर्व वस्तूंच्या भाव वाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. सर्वसामान्य व गरीब जनतेचं मासिक आर्थिक नियोजन कोलमडलं असून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. आधीच वाढलेली बेरोजगारी, कर्ज बाजरीपणामुळे जनता त्रस्त झाली आहे.त्यातच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आत्म हत्या करण्याची वेळ आली आहे. राज्यात वीज बीलात अवाजवी वाढ अशा अनेक समस्यांना सर्वसामान्य व गरीब जनतेला तोंड द्यावे लागत असताना दैनंदिन आवश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.
अशा परिस्थितीत सर्व सामान्य व गरीब जनतेला जगणे कठीण झाले आहे.देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवुन प्रधानमंत्री झालेले मोदी यांनी दैनंदिन अत्य आवश्यक वस्तूंची भरमसाठ दर वाढ करून जनतेचा विश्वास घात केला आहे.ही इंधन दरवाढ व इतर जीवनावशक वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे,राजु निकाळजे,शेख अजीम वणीकर,सय्यद निसार, अनामी मोरे,राजु हिवराळे,नितेश तांगडे,संजय इखारे,लता सरदार निर्मला पेटारे,तबस्सूम पठाण,शमशाद खान,वर्षा जाधव,दुर्गा निकम,नईम शेख,संदीप ढिलपे,अक्षय बनकर,मनोज साळवे, पंडित वेलदोडे,विश्वजित बागुल,साहेबराव गायकवाड,किसन जाधव,संजू धनेधर,आकाश भदर्गे,प्रमोद सोनवणे,आनंद साळवे,अरुण कांबळे,सुभम नवगिरे,राजरत्न कांबळे, रेखा नवगिरे,भीमा मते,गौतम जाधव,आकाश चौथमल आणि नामदेव जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने या धरणे आंदोलनास उपस्थित होते.
परभणी जिल्ह्याच्यावतीने निवेदन देण्यात आले
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हा परभणी च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मराठवाडा संघट प्रमुख ऍड. कपिल खिल्लारे, जिल्हाध्यक्ष मनिष वाव्हळे, भागवत सावणे-जिल्हामहासचिव,संदीप झराडे-जिंतूर तालुकाध्यक्ष,कृष्णा सुतार, अर्जुन सोळंके, बाबा लाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon