राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आज 27 ऑक्टोबर पासून विविध मागण्या संबंधी बेमुदत उपोषण, एसटी प्रवाशांचे मात्र होणार हाल
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आज पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.एसटी महामंडळाने पाच टक्के महागाई भत्ता आणि अडीच हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे.यावर कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आज 27 ऑक्टोबर पासून एसटीच्या सर्व कामगार संघटना बेमुदत उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत .
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता द्यावा तसेच वाढीव घरभाडे देण्यात यावे आणि 15 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा या सह अन्य मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी मोठ्याप्रमाणात या उपोषणात सहभागी होणार असल्याचे एसटी कर्मचाऱ्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाने परिपत्रक काढले आहे की उपोषणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर गैर वर्तनचा ठपका ठेवण्यात येऊन शिस्त भंगाची कार्यवाही केली जाईल.
वेळेवर पगार होत नसल्याने आर्थिक समस्यांना कंटाळून आता पर्यंत 25 कर्मचाऱ्यांनी आत्म हत्या केल्या आहेत.
औद्योगिक न्यायालयाने नियमितपणे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्याचे आदेश देऊनही वेतन वेळेवर होत नाही.वेतन वेळेवर मिळावे व 28 टक्के महागाई भत्ता द्यावा या मागणी सह अन्य काही मागण्या एसटी कर्मचारी कृती समितीने एसटी महामंडळाला दिल्या होत्या.
परंतु मंगळवारी एसटी मंडळाने 5 टक्के महागाई भत्ता वाढ करून अडीच हजार रुपये दिवाळी बोनस देण्याच्या घोषणा केली.12 टक्क्यावरून 17 टक्क्या पर्यंत वेतन वाढ होणार असून 7 नोव्हेंबर ऐवजी 1नोव्हेंबर ला वेतन दिला जाईल अस एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी परिपत्रक काढून घोषणा केली आहे.
महागाई भत्ता 5 टक्के वाढवीला आहे त्यामुळे ही 500-600 रुपये तुटपुंजी वाढ होणार असून कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केला आहे असा आरोप एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे.यामुळे मागण्या मान्य होई पर्यंत राज्यात एसटी कामगार संघटनाकडून बेमुदत उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने एसटी प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon