तक्रारदार बेपत्ता आणि खटले सुरु असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परंबीर सिंग यांना लगावला

सद्या महाराष्ट्रात चौकश्या, धाडसत्र सुरु आहेत परंतु हे जे काही चालू आहेत याला कुठेतरी चौकटीत आणायला पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शंभर कोटीच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परंबीर सिंग हे मागील अनेक दिवसापासून बेपत्ता आहेत. परंबीर सिंग यांच्यावर निशाणा साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले की तक्रारदारचं बेपत्ता आहे आणि खटला सुरु आहे. औरंगाबाद येथील मुंबई उच्चन्यायालयच्या औरंगाबाद खंडापीठाच्या इमारतिचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परंबीर सिंग आणि केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.सद्या राज्यात ज्या पद्धतीने ईडी,सीबीआय कडून चौकश्या आणि धाडसत्रे चालू आहेत याला कुठे तरी चौकटीत आणायला हवे असे  सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून होत असलेल्या कार्यवाही बाबत भाष्य केलं आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना येथील न्यायालयच्या इमारतीचे उदघाट्न करताना "इथे एका प्रतिम न्यायमंदिराचं आज लोकार्पण होत आहे.इमारतीचं भूमी पूजन करण्यास मी नव्हतो परंतु झेंडा लावायला आलो आहे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे असही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.औरंगाबाद शहरातील विधिज्ञ,, कायदे प्रेमी  या इमारतीसंबंधित आहेत.त्या सर्वांना या खंडपिठाचा इतिहास माहिती आहे.ही खंड पिठाची इमारत पाहण्यासाठी सुद्धा लोक आले पाहिजेत. ते स्वतःहून आले पाहिजेत त्यांना बळजबरीने पकडून आणण्याची गरज पडू नये.

या प्रसंगी बोलताना ते म्हणले आपल्याकडे एका म्हण आहे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण या कार्यकर्माच्या निमित्ताने माझे जे काही येणं जाणं चालू आहे त्या विषयी एक गोष्ट अभिमानाने सांगतो की न्यायाधीश दिपांकर दत्ता यांना परवानगी दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे.इथे तुमच्या समोर बोलताना माझ्यावर दडपण येत आहे परंतु लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती समोर जी गर्जना केली तेव्हा त्यांच्यात काय धाडस असेल असही मुख्यमंत्री यावेळी म्हणले.
Previous
Next Post »