बॉलिवूड मुंबई बाहेर जाऊ देणार नाही ;उपमुख्यमंत्री आजीत पवार यांच वक्तव्य

महाराष्ट्राची शान असलेलं बॉलिवूड बाहेर जाऊ दिलं जाणार नाही, काही लोक आले होते बॉलिवूड मुंबई बाहेर घेऊन जाण्यासाठी, असा टोला योगी आदित्यनाथ यांना लगावला.
आज राज्यात नाट्य गृह सुरु करण्यात आले आहेत. कोरोना मुळे मागील अनेक महिन्यापासून राज्यातील नाट्य गृह बंद होते. आज उपमुख्यमंत्री आजीत पवार यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्य गृहास सुरुवात करण्यात आली. नटराजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज पासून राज्यातील नाट्यगृह औपचारिक रित्या सुरु करण्यात आल्याच्या घोषणा आजीत पवार यांनी केली.

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री आजीत पवार म्हणले की  बॉलिवूड मुंबई बाहेर नेण्यासाठी आले होते. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये फिल्म इंडस्ट्री असलेलं बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. चित्रपट सृष्टी महामंडळाला सर्व ते आर्थिक सहकार्य करण्यात येईल असे आजीत पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई मध्ये आले होते. त्यावेळी बॉलिवूड उत्तर प्रदेश मध्ये स्थलांतरित करण्याबाबतची चर्चा केली होती.या वरून आजीत पवारांनी योगी आदित्यनाथ यांना टोलाही लगावला आहे.

कोल्हापूर येथील चित्रपटनगरिमध्ये पुरेशा सुविधा देण्याचा मानस असल्याचे आजीत पवार म्हणले.मुंबई फिल्मसिटी मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देऊ असाही त्यांनी सांगितलं.मुंबईतील फिल्मसिटी मुंबई बाहेर नेण्याचा काही लोक प्रयन्त करत होते तसा त्यांना अधिकारही आहे त्याबाबतीत मला काही बोलायचे नाही परंतु जेव्हा पासून चित्रपट सृष्टीची सुरुवात झाली तेव्हापासून संपूर्ण देशाचं केंद्र मुंबई आहे. आणि ते मुंबई आणि महाराष्ट्रातचं रहावे अशी आपल्या सर्वांचीच ईच्छा आणि अपेक्षा आहे.महाविकास आघाडी सरकार याबाबतीत सर्वोतोपारी प्रयत्न करील. तसेच मराठी चित्रपट सृष्टी संबंधित काही सूचना असतील तर त्याही सांगा असे आजीत पवार यांनी म्हटलं आहे.

कोरोना काळात लावलेल्या कठोर निर्बंधामुळे मागील 7 महिन्यापासून नाटकावर पडलेला पडदा आज पासून दूर होणार आहे.महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर ला नाट्य गृह सुरु करण्याची परवानगी देताच नाट्य गृह सृष्टीत हालचालीना वेग आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री आजीत पवार यांच्या उपस्थितीत रंग मंदिराची तिसरी घंटा बाजविण्यात आली आहे.

सद्या पन्नास टक्के उपस्थितीची परवानगी देऊन आम्ही आता सुरुवात केली आहे.शाळा कॉलेज सुरु झालेत दिवाळी नंतरचा अंदाज आम्ही बघत आहोत.आता कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असून परिस्थिती सुधारत आहे.आपल्याकडून चुका होऊन तिसरी लाट येण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकार चालवत असताना हे बंद करा ते बंद ठेवा अस आम्हालाही योग्य वाटत नाही असं आजीत पवार यांनी म्हटलं आहे 
Previous
Next Post »