आर्यन खान ड्रग्स प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी केलं मोठं विधान ;हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरणाचा केला आरोप

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा, अदानी मुंब्रा बंदरावर 3 हजार किलो ड्रग्स सापडलं त्याचं काय झालं?असा प्रश्नही  विचारला
मुंबई ड्रग्स प्रकरणी सध्या जुडीशिअल कस्टडी मध्ये असलेला शारुख खान यांच्या मुलगा आर्यन खान संबंधात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानापटोले यांनी केंद्र सरकारवर गंभीर असा आरोप केला आहे.हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊन दोन समाजामध्ये जातीय ध्रुवीकारण निर्माण करण्यासाठी कटकारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

3 हजार किलो ड्रग्सचं प्रकरण ज्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न एनसीबी कडून केला जात आहे या वरून नक्कीच दाल में कुछ कला हैं असा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.दुसरीकडे मुंबई ड्रग्स प्रकरणी हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला या प्रकरणात अडकवून हिंदू-मुस्लिम जातीयवाद उफाळून देण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे.

पुढे ते म्हणले की कायदा सर्वांना सम्मान आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कार्यवाही होणारच परंतु अदानी मुंब्रा बंदरावर सापडलेल्या 3 हजार किलो ड्रग्सचं काय झालं? त्याच्यावर कोणतीच कार्यवाही का होत नाही असा प्रश्न नाना पटोलेनी उपस्थित केला. शिवाय आपल्या उद्योगपती मित्रांना यातून वाचविण्यासाठी आणि अदानी मुंब्रा बंदरावर 3 हजार किलो सापडलेल्या ड्रग्स प्रकरणावरून लक्ष हटविण्याकरिता मुंबई ड्रग्स प्रकरणाचा कट रचला आहे. त्यात अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अडकून हिंदू- मुस्लिम वाद उफाळून आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.

मुंबई क्रूझ वरील ड्रग्स पार्टी प्रकरणात सद्या अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान हा ड्रग्स संबंधी बेकायदेशीर रित्या या प्रकरणात सामील होता आणि ड्रग्स विक्री आणि त्याचा पुरवठा करणाऱ्याशी संबंध होता असं निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने बुधवारी आर्यन खानला जमीन देण्यास नकार दिला आहे.या सोबत आमलिपदार्थ प्रतिबंध कायद्या अंतर्गत स्थापना करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या प्रकारणांशी संबंधित आर्यन खान सहित अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांचाही जमीन फेटाळला आहे.

या प्रकरणी यायालयाने निकाल देताना आर्यन खान च्या व्हाट्सअप मेसेजचा दाखला दिला. या प्रकवरणी आर्यन सोबत आणखी दोन आरोपीचा सकृतदर्शनी सहभाग आहे आणि तो गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे जमिनावर सुटून तो पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही हे सांगता येत नाही.तसेच या प्रकरणात एनसीबीने सादर केलेले कागद पत्रे आणि आर्यन व अरबाज यांनी आमली पदार्थ सेवन करण्यासाठी बाळगल्याचा कबुली जबाब दिला होता.अरबाजच्या बुटातून ताब्यात घेतलेल्या ड्रग्स संबंधी त्याला माहिती होती हे स्पष्ट होते असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
Previous
Next Post »