उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊसाने केला कहर,34 लोकांचा मृत्यू,4 लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा

                  ( छाया :पीटीआय )
उत्तराखंड मध्ये अतिवृष्टी , जनजीवन पूर्णपणे विस्कळीत, मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात
उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊसाने तेथील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले आहे. राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धान सिंह रावत आणि राज्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांच्या सोबत नुकसान ग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले आहे.

देहरादून :उत्तराखंड मध्ये सतत मुसळधार पाऊस चालू आहे राज्यात सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली असून आता पर्यंत 34 लोकांचा मृत्यू झाला आहे.बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.उत्तराखंडच्या कुमाऊ भागात सर्वात जास्त पाऊस पडत आहे. अनेक घरं भुईसपाट झाले आहेत.अनेक लोक धिगाऱ्याखाली अडकले आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की आता पर्यंत 34 लोक मरण पावले असून 5 लोक बेपत्ता आहेत. मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल तर ज्यांचे घरं वाहून गेले आहेत त्यांना 1.9 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल तसेच ज्यांचे पशु धनाचे नुकसान झाले त्यांना शक्य टी मदत केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.

राज्याच्या पुरपरिस्थिती विषयी प्रधानमंत्री मोदी यांच्याशी फोन वरून चर्चा करण्यात आली असून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री मोदींनी दिले असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी तानी सांगितलं आहे.
नैनी तालच्या एका अहवालात म्हटलं आहे की जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात अडकलेल्या पर्यटकांना मदत करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.

येणाऱ्या जाणाऱ्याना सावधानतेचा इशारा देण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.धरडी कोसळल्यामुळे वस्त्यातील मार्ग बंद झाले आहेत.त्यामुळे बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे.रामनगर ते राणीखेत मार्गांवरील लेमन ट्री रिसॉर्ट मध्ये जवळ जवळ 100 लोकं अडकले आहेत. कोसी नदीचे पाणी रिसॉर्ट मध्ये शिरल्याने भीती व्यक्त केली जात आहे.अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने नैनीताल कडे जाणाऱ्या तिन्ही रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागाचा या पर्यटन स्थळाशी संपर्क तुटला आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील जनतेला अस्वस्थ केलं आहे की सैन्याचे तीन हेलिकॉप्टर मदत करण्यासाठी फिरत आहेत. त्यातील दोन हेलिकॉप्टर नैनिताल पाठवले जातील कारण तिथे जास्त पाऊस झाल्याने जास्त नुकसान झाले आहे घरं पडली आहेत दरडी कोसळ्यामुळे धिगाऱ्याखाली लोक अडकले आहेत.एक हेलिकॉप्टर गढवाल जिल्ह्यात मदत कार्यासाठी पाठवले जाईल.

नैनिताल जिल्ह्यात वीज, दुरसंचार सेवा आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे प्रभावित झाली आहे.राज्याच्या हवामान विभागाकडून नैनिताल 90 मिलिमिटर ,हलदवानी 128 मिमी,कोशाकुटोली 86.6मिमी,अल्मोडा 216.6मीमी, द्वाराहाट 184मिमी व जोगेश्वरी 176मिमी पाऊस झाल्याचे सांगितलं आहे.

Previous
Next Post »