पेट्रोल-डिझेल,घरगुती गॅस,खाद्य तेल यांची प्रचंड दर वाढ व भरमसाठ वीज बील विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा 25 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रात एल्गार
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने देशातील व राज्यातील इंधन वाढ, घरगुती गॅस, सी एन जी, एल पी जी व खाद्य तेलांची प्रचंड दर वाढ तसेच राज्यात वीज बीलात होणाऱ्या भरमसाठ वाढीच्या विरोधात तसेच केंद्र व राज्यसरकारच्या निष्क्रिय धोरणा विरोधात दि 25 ऑक्टोबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एल्गार पुकारला आहे.
दि 25 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 ते 5 पर्यंत उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत.पेट्रोल डिझेल रसोई गॅस व खाद्य तेल यांची प्रचंड भाव वाढ तसेच अवाजवी वीज बीलं याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदने पाठवली जाणार आहेत.
या आंदोलनाद्वारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेल, रसोई गॅस यावर लावलेले विविध कर दोन्ही सरकारने कमी करण्याचे आवाहन करत आहे.तसेच राज्यात विद्युत महामंडळाने वीज बिलातील विविध कर उदाहरनार्थ स्थिर आकार, इंधन आकार,वहन आकार व समायोजित आकार अशा प्रकारचे अनेक करांचे जनतेवरील ओझे कमी करण्यात यावे असे आवाहन राज्यसरकारला करीत आहोत.
केंद्रातील मोदी सरकार भांडवलदार उद्योगपतीचे हितसंवर्धक मित्र असल्यामुळे पेट्रोल डिझेल भाव वाढी बाबत पेट्रोल डिझेल कर माफ करणार नाही. परंतु महाराष्ट्र सरकारने राज्यातील इंधन कर कमी करून राज्य सरकार हे भांडवालदाराचे सरकार नाही किंवा मोदी सरकारची प्रतिकृती नाही हे जनतेला दाखवून देण्याचे आघाडी सरकारला आवाहन करीत आहोत. याशिवाय मोदी सरकार व आघाडी सरकार यातील सामान्य जनतेच्या हिताचे कोणते सरकार आहे हे दाखून देण्याची वेळ आली आहे.
देशातील व राज्यातील प्रचंड महागाई, कोरोनाची भीषण रोगराई या मुळे रोजगार आर्थिक साधने उध्वस्त झाल्यामुळे सामान्य माणसाचे गोरगरिबांचे पारिवारिक आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.त्यामुळे राज्यातील गोरगरीब जनतेला शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातून मदत देण्या ऐवजी सरकार तर्फे अनेक कराचे ओझे जनतेच्या पाठीवर लादले जात आहे त्याबद्दल केंद्र व राज्य सरकारच्या करपद्धतीबद्दल बीआरएसपी जाहीर निषेध करत आहे.
केंद्र व राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करून न्याय द्यावा अन्यथा पक्षाकडून लवकरच अतिउग्र आंदोलन जाहीर करण्यात येत आहे असे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon