महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी गट क आणि गट ड संवर्गातील 9,500 पेक्षा जास्त पदाची भरती परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 24 आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेतली जाणार आहे.परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पात्र परीक्षार्थ्यांना प्रवेश पत्र वितरण करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेची पूर्ण तयारी झाली असून कुठल्याही अफवावर विश्वास ठेवूनये असं परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या 'न्यासा' कम्युनिकेशन कंपनी कडून सांगण्यात आले आहे.प्रवेश पत्रामध्ये चुका असल्याचा आरोप काही लोक आणि संघटनाकडून मुद्दाम खोडसाळपणे करत असून अफवा उडवून परीक्षार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.असा आरोप न्यासा कम्युनिकेशनने केला असून त्या आरोपात कुठलेच तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या गट 'क' आणि गट 'ड' संवर्गातील पदांची भरती परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून या भरती परीक्षेला आठ लाखून अधिक परीक्षार्थी असून त्यासाठी एक हजार परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.मागील सप्टेंबर महिन्यात होणारी परीक्षा तांत्रिक कारणास्तव रद्द करून पुढे ढकलण्यात आली होती. आता सर्व तांत्रिक बाबीची त्रुटी दुरुस्त करून परीक्षा घेतली जाणार आहे.24 ऑक्टोबर रोजी होणारी गट 'क' संवर्गाची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे तर 31 ऑक्टोबर रोजी होणारी गट 'ड ' संवर्गाची परीक्षा एकाच सत्रात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना नियमांचे पालन करूनच होणार परीक्षा
24 ऑक्टोबर रोजी गट 'क' संवर्गातील परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे तर 31 ऑक्टोबर रोजीची गट 'ड' संवर्गातील परीक्षा एकाच सत्रात घेण्यात येणार आहे.राज्य सरकार व आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे व कोरोना विषयक बाबीचे काटेकोर पणे पालन करण्यात येणार असून पारदर्शक पद्धतीने परीक्षा पार पडेल. असं परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रा.ली कंपनीकडून सांगण्यात आले आहे.ऑनलाईन प्रवेश पत्र वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून परीक्षा केंद्र आणि इतर बाबीची माहिती परीक्षा प्रवेश पत्रात देण्यात आली आहे.
शासकीय नियमानुसार परीक्षा केंद्राची निश्चिती.
परीक्षा बद्दल शासकीय परिपत्रकात दिलेल्या नियमानुसारच परीक्षार्थिनी अर्जात भरलेल्या माहितीनुसार परीक्षा केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे.पुणे किंवा नागपूर विभागातील परीक्षार्थीना त्याविभागातील कोणत्याही जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच विविध पदासाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थ्यांना स्वतंत्र पणे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon