केरळात मुसळधार पाऊसाने एकाच कुटुंबातील 6 जणांसहित 8 जनांचा घेतला बळी, अनेक जन बेपत्ता,24 तासाचा अलर्ट
केरळ : केरळातील दक्षिण व मध्य भागात आज झालेल्या मुसळधार पाऊसाने अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळ्या आहेत. राज्यातील चौदाही जिल्ह्यात शुक्रवार पासून पाऊस सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला असून एक डझनहून अधिक लोक बेपत्ता आहेत.
कोट्टायम :केरळमध्ये शुक्रवार पासून सुरु असलेल्या मुसळ धार पाऊसाने आता पर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत.सुरक्षा सैनिकांची एक तुकडी आधीच कोट्टयाम जिल्यातील कुटीकल या ठिकाणी रवाना करण्यात आली आहे जिथे दरडी कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेत दोन परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यातील एका परिवारातील 6 जनाचा मृत्यू झाला आहे.तर एका परिवारातील चार जन बेपत्ता आहेत.मुसळधार पाऊस पडत असल्याने 6 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे तर 6 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.यावरून राज्यातील चौदाही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याचे संकेत आहेत.
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव कार्यासाठी सरकारने वायूसेना आणि नौसेनेच्या तुकड्या पाचरण करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon