औरंगाबाद शहरातील पूर्व विधानसभा क्षेत्रातील तरुणांचा बीआरएसपी मध्ये प्रवेश

औरंगाबाद शहरातील तरुणांचा आकाश भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीआरएसपी मध्ये प्रवेश:
औरंगाबाद : आज विजयादशमी दिनाचे औचित्य साधून शहरातील पूर्व विधानसभा क्षेत्रामधील राजनगर येथील तरुणांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये प्रवेश केला.पश्चिम विभाग शहर सचिव आकाश भद्रे यांच्या मार्गदशनाखाली हा पक्ष प्रवेश झाला.जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी अरुण कांबळे यांना पूर्व शहर सचिव तर गौतम जाधव यांना वार्ड सचिव म्हणून नियुक्ती पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्ह्यात बी आर एस पी चा जनाधार दिवसेंदिवस दिवस वाढत असून रोज कुठेना कुठे पक्ष प्रवेश होत आहेत.विविध जाती धर्मातील लोकं पक्षात प्रवेश करत आहेत. जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरून कामकरण्याचा प्रामाणिक पणा आणि जिद्द यामुळे औरंगाबाद शहरातील लोकांचा बीआरएसपीकडे कल वाढला आहे.सध्या औरंगाबाद शहरात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून लोक बघत आहेत.
Previous
Next Post »