आजीत पवारांना धक्का ;बहिणीच्या घरी सापडली बेहिशोबी मालमत्ता


दोन व्यावसायिक समूह व आजीत पवार यांच्या बहिणीच्या घरी टाकलेल्या धाडीत 184 कोटीचं सापडलं घबाड
केंद्रीय प्रत्येक्ष कर विभागाकडून दोन रिअल स्टेट व्यावसायिक समूहावर व आजीत पवार यांच्या बहिणीच्या घरी धाडी टाकून छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली असल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला दिली आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 7 ऑक्टोबर रोजी मुंबई पुणे गोवा आणि बारामती अशा 70 ठिकाणी छापेमारी केली होती अशी माहिती सीबीडीटीने एका निवेदणाद्वारे दिली आहे.

या छापेमारी दरम्यान काही पुरावे गोळा करण्यात आले होते त्यानुसार प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत.दोन्ही व्यावसायिक समूहाकडून जवळपास 184 कोटी रुपयांच्या बेहिशेबी उत्पन्नाचा पुरावा असणारे कागद पत्र सापडली असल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.परंतु आतापर्यंत या संस्थांची नावे मात्र जाहीर करण्यात आली नाही.या छापेमारीत आतापर्यंत 2.13कोटीची रोकडं आणि 4.32 कोटीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या संस्थांनाचे अनेक आर्थिक व्यवहार संशयापद असल्याचे देखील म्हटले आहे.

या कंपन्याचे आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे कि बोगस शेअर प्रिमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विविध सेवासाठी असमाधानकारक अडव्हान्स दिले गेले असून अस्तित्वात नसलेल्या कंपन्यासोबत सौदेबाजी करून पैसा मिळविला असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणात महाराष्ट्रा राज्याचे उपमुख्यमंत्री आजीत पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.

 संशयास्पद मिळवलेल्या बेहिशेबी पैशांचा उपयोग अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आला आहे.या पैशाचा वापर करून मुंबई मध्ये एका मुख्यठिकाणी कार्यालयाची इमारत, दिल्ली मध्ये हायप्रोफाइल वस्ती मध्ये अलिशान फ्लॅट, गोव्यामध्ये रिसॉर्ट आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतजमिनी खरीदी केल्या आहेत.तसेच साखर कारखान्यात गुंतवणूक करण्यात आली आहे.या सर्व मालमत्तेची एकूण किंमत 170 कोटी रुपयापर्यंत गेली असल्याचे सीबीडीटीच्या निवेदनात म्हटलं आहे.
Previous
Next Post »