गंगापूर तालुक्यातील तरुणांचा बीआरएसपी मध्ये प्रवेश

औरंगाबाद जिल्यातील गंगापूर तालुक्यात अनेक तरुणांचा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये प्रवेश
औरंगाबाद : आज गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी,वाळूज आणि पंढरपूर भागातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.युवा नेते अजय बनकर यांची गंगापूर तालुका अध्यक्ष पदी तर सहदेव लहाने यांची गंगापूर तालुका सचिव पदी निवड करण्यात आली तसेच सचिन पठारे यांची वाळूज महानगर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या वेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हा उपाध्यक्ष-शेख अजीमभाई वणीकर,युवा जिल्हाध्यक्ष-राजु निकाळजे,युवा शहर अध्यक्ष-अनामी मोरे, वाळूज महानगर अध्यक्ष-मनोज साळवे, आकाश भद्रे शहर सचिव,सुभम नवगिरे वार्ड अध्यक्ष, मनोज नाथभजन, महेंद्र गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous
Next Post »