बापरे बाप! 3 कोटी 65 लाखांचा गांजा जप्त, वाशीम पोलिसांची मोठी कार्यवाही

कोंबडी खाद्याच्या नावाखाली गांजाची वाहतूक करणारा आयशर ट्रक( क्र.एमएच 28 बीबी 0867) हिंगोलीत पकडण्यात वाशीम पोलिसांना यश
ड्रग प्रकरण : काल वाशीम पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत 3कोटी 65 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. वाशीम पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कोंबडी खाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची हिंगोली हद्दीत रिसोड-हिंगोली रोडवर झाडाझाडती घेतली असता कोंबडी खाद्य (पोल्ट्री फीड )वाहतूकीच्या नावाखाली तब्ब्ल 3 कोटी 65 लाख रुपये किंमतीचा गांजा सापडला.

वाशीम हद्दीतून अवैध रित्या गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिति वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना दिली. त्यानुसार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून हिंगोली -रिसोड रोडवर सापळा रचून आयशर ट्रक (क्र. एमएच 28 बीबी 0867) पकडला. ट्रक ची झाडाझाडती घेतली असतात कोंबडी खाद्य (पोल्ट्री फीड ) वाहतूकीच्या नावाखाली गांजाची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.या कार्यवाहीत तब्ब्ल 3 कोटी 65 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.जप्त केलेला गांजा आंध्र प्रदेश व इतर राज्यातून मागवला असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत गोटीराम गुरदयाल साबळे (52 वर्ष )रा. कुऱ्हा ता. मोताळा जि.बुलढाणा,सिद्धार्थ भिकाजी गवांदे रा. निमगाव ता. नांदुरा जि. बुलढाणा,प्रवीण सुपडा चव्हाण रा. हानवतखेडा ता. मोताळा, जि. बुलढाणा,संदीप सुपडा चव्हाण रा. हानवतखेडा ता. मोताळा, जि. बुलढाणा अशी पकडण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहेत.

Previous
Next Post »