औरंगाबाद शहरातील पडेगाव वार्डातील बीआरएसपी शाखा फलकाची समाज कंठकांकडून विटंबना केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल, घटनास्थळाचा पोलिसाकडून पंचनामा, दोषींवर कार्यवाही करण्याचे पोलिसांनी दिले आश्वासन
औरंगाबाद : काल औरंगाबाद शहरातील पडेगाव येथील बी आर एस पी च्या वार्ड शाखा फलकावर चिखल फेकून काही समाज कंठकांकडून विटंबना करण्यात आली होती.या घटनेची माहिती मिळताच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखव केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.पोलिसांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाऱ्यांनी शाखा फलकाची साफसफाई केली.
मुस्लीम समाजाचा बीआरएसपीकडे जास्त कल वाढत असल्यामुळे, मुस्लिम समाजावर आपलीच मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या पक्षांची झोप उडाली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी म्हटलं आहे.
शाखा विटंबनाप्रकरणी पंचनामा करतेवेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे,शेख अझीमभाई जिल्हा-उपाध्यक्ष,सय्यद निसार-शहर अध्यक्ष,संदीप ढिलपे-युवा जिल्हा उपाध्यक्ष,नितेश तांगडे-जिल्हा सचिव,तब्बसूम पठाण मध्य शहर अध्यक्ष,शमशाद शेख-वार्ड अध्यक्ष,जितेंद्र बोर्डे पश्चिम अध्यक्ष, सुभम नवगिरे -वार्ड अध्यक्ष आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon