उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
भारत हा विविध धर्म जाती पंथानी व विविध बोली भाषांनी नटलेला देश आहे.भारतीय संविधानाने देशातील प्रत्यक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे मग तो कुठल्याही धर्माचा असो वा जातीचा असो.त्यामुळेच देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे. परंतु कोणी देश विरोधी कृत्य करत असेल किंवा एखादा व्यक्ती देशाचा अपमान होईल असं वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कायद्याने देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करून खटला चालवला जातो.आरोप सिद्ध झाल्यास मृत्यू दंडही दिला जाऊ शकते.
नुक्ताच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजवट सैतानी व रक्त शोषक राक्षस आहे असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करून देशाचा अपमान केला असा आरोप त्यांच्यावर भाजपा कार्यकर्ता आकाश सक्सेना यांनी केला आहे.त्यांच्या तक्रारी वरून उत्तर प्रदेशात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खरच एखाद्या व्यक्तीने एखाद्याला सैतानी म्हटले तर दोन समाजात तेढ निर्माण होते का आणि अशा वक्तव्यामुळे देशाचा अपमान होतो का? जर एखाद्या नेत्याच्या किंवा सत्ताधाऱ्या कारभाराला कोणी सैतानी राजवट म्हटल्यामुळे त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर भाजपाच्या अनेक नेत्यांनी आमदार खासदारांनी मुस्लीम विरोधी आणि अनुसूचित जाती जमाती विरोधात वक्तव्य केलेली आहेत.भाजपा नेत्यांनी केलेले वक्तव्य दोन समाजात तेढ निर्माण करणारे नाहीत का? किंवा त्यांच्या वक्तव्याने देशाचा अपमान होत नाही का? त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना व यांच्या राजवटीला सैतान व रक्त शोषक म्हटल्याने उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर महाराष्ट्रात भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सुद्धा महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अपमानास्पद वक्तवे केलं होत.
परंतु उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी हे मुस्लिम असल्यामुळे केवळ जातीय द्वेशापोटी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाजपा सरकार किंवा भाजपा नेत्याच्या विरोधात कोणी बोललं तर त्याव्यक्तीच्या विरोधात भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीने कार्यवाही करत आहे. मग भाजपा शासित राज्य असो की भाजपाचे केंद्रातील सरकार असो.भाजपा च्या विरोधात कोणीही बोललं तर त्यावर सीबीआय,ईडी आणि देशद्रोही सारखे गुन्हे दाखल केली जात आहेत.ही लोकशाही नसून हु्कीम शाही आहे. भाजपा प्रणित सरकारे व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कट दाबी करत आहेत. हे मात्र निश्चित आहे.
Former Uttar Pradesh governor charged with treason
India is a country of different religions, castes, creeds and different dialects. The Indian Constitution has given individual freedom to every citizen of the country, irrespective of their religion or caste. That is why the unity and integrity of the country is maintained. However, if a person commits an act against the country or makes a statement that insults the country, he is prosecuted as a traitor by law. If convicted, he may be sentenced to death.
Former Uttar Pradesh Governor Aziz Qureshi has recently been charged with treason. BJP activist Akash Saxena has accused Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath of insulting the country by creating a social rift.
In fact, if a person calls someone a devil, does it create a rift between the two societies and does such a statement insult the country? If calling a leader or a ruling party a satanic regime can lead to a charge of treason against him, then many BJP leaders, MLAs and MPs have made statements against Muslims and Scheduled Castes and Scheduled Tribes. Aren't the statements made by BJP leaders divisive? Or does his statement insult the country? They should also be charged with treason.
If the former Uttar Pradesh governor is being charged with treason for calling Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and his regime a devil and a blood-sucker, then the Maharashtra government should also file a treason case against BJP Union Minister Narayan Rane in Maharashtra. Because Narayan Rane had made insulting statements about Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray.
However, the former governor of Uttar Pradesh, Aziz Qureshi, has been charged with treason only because of his ethnic hatred as he is a Muslim. Whether it is a BJP-ruled state or a BJP government at the Center, if anyone speaks against the BJP, crimes like CBI, ED and treason are being filed against it. BJP-led governments are claiming the mascot of individual freedom. This, however, is certain.
ConversionConversion EmoticonEmoticon