राजकीय नेते सत्तेसाठी कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही:
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हात मिळवून सत्ता स्थापन केली तेव्हा पासून ही गोष्ट भाजपच्या काही पचणी पडत नाही. सतत शिवसेना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी टिका केली जाते. राजकारणात टीका टिप्पणी होत असते त्यात काही नविन नाही परंतु द्वेषभावनेने एखाद्याला लक्ष करणे कितपत योग्य आहे?. निवडून आलेले लोक प्रतिनिधी शपथ घेतात की कुणासोबत ही द्वेषभावनेने वागणार नाही. परंतु याचा सगळ्याच लोकप्रतिनिधीना विसर पडतो आणि सुडाच्या भावनेने आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत वागायला लागतात.
काल महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला "फेविकॉल सरकार" असं म्हटलं आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या सरकार मध्ये फक्त राष्ट्रवादीलाच फायदा होतो असं देखील म्हटलं आहे.चंद्रकांत पाटील खूप लवकर विसरून गेलेत. लोक झोपेत असताना राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करून पहाटेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती.त्यावेळेस भाजपाने शिवसेनेला सोडून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला तेव्हा कोणाचा फायदा होता. त्यावेळेस तुमच्यात कोणती नैतिकता होती.
सत्तेसाठी हपहपलेले तुम्ही राष्ट्रवादी सोबत हातमिळवनी केली. तेव्हा राष्ट्रवादी तुमच्यासाठी चांगली होती. तेव्हा राष्ट्रवादी मध्ये कोणी भ्रष्ट नव्हते. बहुमत सिद्ध करता येत नाही म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली.तुम्ही काहीही केलं तर सर्व काही ठीक आहे आणि दुसऱ्याने केलं तर ते चूक आहे. आता मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सर्वच भ्रष्ट आहे.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राज्यात भाजपाची सत्ता आली असती तर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर भ्रष्टाचारचे आरोप झाले नसते. कोणावरही ईडी किंवा सीबीआय ची चौकशी झाली नसती. अनेक नेत्यावर भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले गुन्हे मागे घेण्यात आले असते आणि सर्वजण भ्रष्टाचार मुक्त झाले असते.पाप धुवून काढण्यासाठी जसे अनेक लोक गंगेत अंघोळ करतात. तसेच कितीही भ्रष्टाचारी लोक भाजपात घेले की भ्रष्टाचार मुक्त होतात. परंतु महाराष्ट्रात सत्ते पासून दूर राहावं लागत असल्यामुळे सर्व शत्रू दिसायला लागले आहेत.यावरून भाजपाची सत्तेसाठी हापापलेली मानसिकता दिसून येते.सत्तेसाठी काही पण अशी भाजपाची नीती आहे?
It is not a matter of what political leaders will ever say or do for power:
In Maharashtra, since the Shiv Sena left the BJP and joined hands with the NCP and the Congress, the BJP has not been able to digest this. Shiv Sena or Chief Minister Uddhav Thackeray is constantly criticized. Criticism in politics is nothing new, but how appropriate is it to pay attention to someone with hatred ?. Elected representatives swear that they will not treat anyone with hatred. But this is forgotten by all the people's representatives and they start dealing with the leader of their opposition with a sense of revenge.
Yesterday, Maharashtra BJP state president Chandrakant Patil called the Mahavikas Aghadi government a "favicol government". He did not stop there, but he also said that only the NCP benefits in this government. Chandrakant Patil forgot very soon. Devendra Fadnavis was sworn in as the Chief Minister in the early hours of the morning by joining hands with the NCP while the people were asleep. What morality did you have at that time?
Aspiring for power, you shook hands with the NCP. NCP was good for you then. There was no one corrupt in the NCP then. Devendra Fadnavis, who was sworn in as the Chief Minister, was embarrassed to resign as the majority could not be proved. If you do anything, everything is fine and if someone else does it, it is wrong. But now Shiv Sena, NCP and Congress are all corrupt.
Had the BJP come to power in the state with the support of the NCP, not a single NCP leader would have been accused of corruption. No one would have been questioned by the ED or the CBI. Many leaders would have been acquitted of all charges related to corruption and all would have been freed from corruption. Also, no matter how many corrupt people join the BJP, corruption is free. But since we have to stay away from power in Maharashtra, all the enemies have started appearing. This shows the BJP's greedy mentality for power. Is there any such policy for power?
ConversionConversion EmoticonEmoticon