देशाच्या आर्थिक अधोगतीला भ्रष्टाचारी नेते जबाबदार :
देशातील वाढती बेरोजगारी देवसेंदिवस वाढणारी महागाई ही ठराविक लोकांकडे केंद्रित झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे झाली आहे. भ्रष्टाचारी नेत्यांनी जमवलेला पैसा हा देशातील जनतेचा असतो. विविध योजनाच्या माध्येमातून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तो त्यांच्या पर्यंत पोहचायला पाहिजे परंतु भ्रष्टाचारी नेत्यामुळे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. नेते
भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सुद्धा भ्रष्टाचारी बनतात. जनकल्याणच्या योजना कागदावरच राबवल्या जातात. प्रत्येक्षात मात्र जनतेला लाभ मिळत नाही.
भ्रष्टाचारी नेते कोणत्याही पक्षाचे असोत ते जनतेचा पैसा लुटणारे असतात. सर्वसामान्य एक लाख लोकांकडे जेवढी संपत्ती असती तेवढी संपत्ती एकाच भ्रष्टाचारी नेत्याकडे असते. देशातील एकूण संपतीच्या 80 टक्के संपत्ती 10 टक्के लोकांकडे आहे.त्यामध्ये राजकीय पक्षाचे नेते अधिकारी आणि उद्योगपती यांच्या कडे एवढी धन संपत्ती आहे. मात्र देशातील 80 टक्के लोकांकडे 20 टक्के संपत्ती आहे.याचाच अर्थ असा कि देशातील एकूण संपत्तीच्या 80 टक्के संपत्तीवर वरील 10 टक्के लोकांचा कब्जा आहे.
देशातीच्या आर्थिक दिवाळखोरीला राजकीय पक्षाचे नेते जबादार असतात. सहकारी कारखाने सहकारी बँका नेते मंडळींनी लुटून खाल्या आहेत.करोडो रुपये कर्ज घेऊन सहकारी कारखाने आणि सहकारी बँका दिवाळखोरीत काढल्या आहेत. जनतेच्या कल्याणासाठी ज्या पैशांचा वापर व्हायला पाहिजे ते पैसे नेते मंडळी खाऊन बसतात. जनतेच्या वाट्याला मात्र निराशाच येते.विविध जनकल्याणाच्या योजनामध्ये तालुका पातळी पासून ते देशपातळीवर आर्थिक घोटाळे केले जातात. हे घोटाळे लाखो हजार करोड रुपयांचे झालेले आपण ऐकले आहेत. युरिया घोटाळा, चारा घोटाळा,बोफोर्स घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा,कॉमन वेलथ गेम घोटाळा, राफेल घोटाळा, हे राष्ट्रीय स्तरावरील लाखो हजार कोटी मध्ये झालेले आर्थिक भ्रष्टाचार आहेत.
राज्यपातळीवर व जिल्हा पातळीवर सुद्धा असे अनेक हजारो कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले जातात. सहकारी कारखाने आणि सहकारी बँका लुटून जनतेचा पैसा राजकीय पक्षाचे नेते हडप करतात. सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा हे नेते मंडळी लुटतात. आणि देशाची आर्थिक अधोगती करण्यास कारणीभूत ठरतात.
इथे हा लेख लिहिण्याचा खटाटोप यासाठी करत आहे कि सध्या महाराष्ट्रात अनेक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. ठिकठिकाणी ईडीकडून आयकर विभागाकडून छापे मारले जात आहेत. त्यात अनेकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात येत आहेत.इथे एक गोष्ट नक्की सांगावी वाटते राजकीय नेते गैर मार्गाने धन संपत्ती मिळवून झाले मालामाल पण देश मात्र केला कंगाल.
Corrupt leaders responsible for the country's economic downturn:
Rising unemployment in the country is due to the rising economy. The money collected by corrupt leaders belongs to the people of the country. He should reach out to the masses for all-round development through various schemes but it does not reach the masses due to corrupt leaders. Leader
Being corrupt, the officials in the administration who work under them also become corrupt. Public welfare schemes are implemented on paper only. In reality, however, the masses do not benefit.
Corrupt leaders, no matter which party they belong to, are looters of public money. A single corrupt leader has as much wealth as the average one lakh people have. Eighty per cent of the country's total wealth is owned by 10 per cent of the people, including political party leaders, officials and industrialists. However, 80 per cent of the people in the country have 20 per cent wealth. This means that 80 per cent of the total wealth in the country is owned by the top 10 per cent.
Political party leaders are responsible for the country's economic bankruptcy. Co-operative factories have been looted by the leaders of co-operative banks. Co-operative factories and co-operative banks have gone bankrupt with loans of crores of rupees. The money that should be used for the welfare of the people is spent by the leaders. However, the share of the people is disappointed. In various welfare schemes, financial scams are carried out from the taluka level to the national level. We have heard that these scams are worth lakhs of thousands of crores of rupees. The urea scam, the fodder scam, the Bofors scam, the 2G spectrum scam, the Commonwealth Games scam, the Raphael scam, these are the millions of crores of crores of rupees of national level financial corruption.
Thousands of crores of rupees are being embezzled at the state level and also at the district level. Co-operative factories and co-operative banks are looted and people's money is snatched by political party leaders. The money of the sweat of the common people is looted by these leaders. And cause the country's economic decline.
I am writing this article here because many leaders in Maharashtra are being accused of corruption. In some places, raids are being carried out by the Income Tax Department from the ED. Corruption cases of many are coming to light. One thing seems to be clear here.
ConversionConversion EmoticonEmoticon