लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी 5 करोड देणारे मतदार संघाचा विकास करणार का?
लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी 5 करोड रुपये देऊनही तिकीट मिळाले नसल्याचा आरोप करत काँग्रेस नेते व वकील संजीवकुमार सिंह यांनी बिहारचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रीय जनता दल (राजद ) नेते तेजस्वी यादव व राज्यसभा सदस्य मिसा भारती सहित बिहार काँग्रेस अध्यक्ष मदन मोहन झा,सदानंद सिंह, राजेश राठोड यांच्यावर पाटणा न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील भागलपूर लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी 15 जानेवारी 2019 रोजी 5 करोड रुपये दिले होते परंतु तिकीट दिले नाही असा आरोप संजीवकुमार सिंह यांनी केला आहे.18 ऑगस्ट रोजी राजद नेते तेजस्वी यादव, मिसा भारतीसह बिहार काँग्रेस अध्यक्ष मदन मोहन झा, सदानंद सिंह, राजेश राठोड यांच्यावर पाटणा न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले असून वरील सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आता यावर विरोधक चांगलच तोंड सुख घेतील यात शंका नाही. परंतु खरा मुद्दा हा आहे कि लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जर 5 करोड रुपये दिले जात असतील तर मग निवडणूक लढविण्यासाठी किती करोड रुपये खर्च केला जात असेल.याची कल्पना आपल्या सर्वांना आलीच असेल.त्यात ही निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड आणि भेद या सर्व गोष्टींचा वापर राजकारणी करतात.त्यामुळे या गोष्टींचा मतदारावर परिणाम होतो. मतदारांना भयमुक्त मतदान करता येत नाही.निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकी साठी खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे.परंतु निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या किती तरी पट जास्त खर्च निवडणुकीत केला जातो या वरून स्पष्ट होते.
निवडणुकीसाठी उमेदवाराकडून एवढा खर्च केला जात असेल तर निवडून आल्यानंतर त्या मतदार संघाचा खरच विकास होणार का? एवढा खर्च निवडणुकीत करणारे लोक विकास करण्यासाठी राजकारणात येत नाहीत तर राजकारणातून पैसा मिळविण्यासाठी येतात. त्यामुळे अशा लोकांकडून मतदार संघाच्या विकासाची कल्पना करणे म्हणजे मूर्ख पणा ठरेलं.हे बिहार मधेच होते असं नाही. देशात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विधानसभा लोकसभा सर्वच प्रकाच्या निवडणुकीत अशा प्रकारे खर्च केला जातो.हे सर्व जनतेला माहित असतं.
ज्याप्रमाणे तेजस्वी यादव व अन्य लोकांनी 5 करोड रुपये घेऊन लोकसभेचे तिकीट दिले नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे तिकीट मिळविण्यासाठी 5 करोड रुपये देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात सुद्धा निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला पाहिजे.निवडणूकित अशा प्रकारे पैशाचा वापर करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचं सर्रास पणे उल्लंघन केलं आहे. म्हणून उमेदवारी देण्यासाठी 5 करोड रुपये घेणारे जेवढे दोषी आहेत तेवढाच तिकीट मिळविण्यासाठी 5 करोड रुपये देणारा व्यक्ती दोषी आहे. त्यामुळे यांच्या विरोधात सुद्धा निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला पाहिजे.
Will he develop a constituency that pays Rs 5 crore to get Lok Sabha candidature?
Alleging that he did not get a ticket despite paying Rs 5 crore for his Lok Sabha candidature, Congress leader and lawyer Sanjeev Kumar Singh along with Bihar Opposition Leader and Rashtriya Janata Dal (RJD) leader Tejaswi Yadav and Rajya Sabha member Misa Bharti along with Bihar Congress presidents Madan Mohan Jha, Sadanand Singh and Rajesh Rathore. It is learned that a charge sheet has been filed against him in the Patna court.
Sanjeev Kumar Singh has alleged that he had paid Rs 5 crore on January 15, 2019 to get Bhagalpur Lok Sabha candidature in the 2019 Lok Sabha elections in Bihar but did not get a ticket. A chargesheet has been filed against Rajesh Rathore in Patna court and the court has ordered to file charges against all of them.
Now there is no doubt that the opponents will be happy about this. But the real point is that if Rs 5 crore is being given to get a Lok Sabha candidature, then how many crores will be spent to contest the elections. We all have an idea. .So these things affect the voter. Voters cannot vote without fear. The Election Commission has set spending limits for each election.
If so much is being spent by the candidate for the election, will that constituency really develop after getting elected? People who spend so much in elections do not come to politics for development but to get money from politics. Therefore, it would be foolish for such people to imagine the development of the constituency. This is not the case in Bihar. This is how it is spent in all types of elections from Gram Panchayat elections to Vidhan Sabha and Lok Sabha elections all over the country. Everyone knows this.
A case has been registered against Tejaswi Yadav and others for not paying Rs 5 crore for a Lok Sabha ticket. Similarly, the Election Commission should also file a case against a person who pays Rs 5 crore to get a ticket. Therefore, a person who pays Rs 5 crore to get a ticket is as guilty as those who take Rs 5 crore for candidature. Therefore, the Election Commission should also file a case against him.
ConversionConversion EmoticonEmoticon