मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गर्भीत ईशारा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला
गर्भीत ईशारा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलत असताना आजी माजी एकत्र आल्यास भावी सहकारी होतील या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे. सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.प्रत्येकजन तर्क-वितर्क करायला लागले आहेत.या विषयी भाजपाकडून देवेंद्र पडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याचे स्वागत केलं आहे. भाजप सेना भविष्यात एकत्र येऊ शकतात अशी अशा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाटू लागली आहे.

सध्याचं महाविकास आघाडीचे सरकार हे भिन्न विचारधारा असलेल्या तीन पक्षाचं सरकार आहे. केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत.त्यामुळे साहजिकच धोरणं ठरवताना किंवा मर्जी प्रमाणे कामे होत नसल्याने अंतर्गत दुसफूस चालू आहे.अनेक वेळा एकमेकांवर कुरघोडी करताना पाहायला मिळते आहे. त्यातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबाद येथे आले असता त्यांनी कार्यक्रमात बोलताना आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी असं रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून बोलल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

भविष्यात शिवसेना भाजप एकत्र येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.तसं तर राजकारणात काहीही शक्य आहे. हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं उदाहरणं आहे.तसही सेना भाजप हे 25 वर्षांपासूनचे मित्र होतेच ना? त्यामुळे पुन्हा सेना भाजप एकत्र आल्यास त्यात नविन असं काहीच नाही.परंतु ही शक्यता कधी होईल जर पुढील तीन वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर.परंतु भाजप यासाठी तयार होईल का? ज्याच्यामुळे शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकारच स्टीअरिंग हाती घेतलं.ते भाजपा सोबत पुन्हा गेल्यास शक्य होणार आहे का? जर भाजपाने एक पाऊल मागे घेतल्यास ते शक्य आहे.

परंतु महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार मध्ये सर्वकाही ठीक आहे असं नाही.याच कारणास्तव राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना धमकी तर दिली जात नाही ना? जर तुम्ही मला त्रास दिला तर मी भाजपा सोबत जाऊ शकतो.कदाचित मुख्यमंत्र्यांना हेच सांगायचे असेल.राष्ट्रवादी आणि काँग्रेसने डोईजड होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील या दोन पक्षांना एकप्रकारे ईशाराच दिला असावा हे याठिकाणी दिसून येत आहे.


Chief Minister Uddhav Thackeray's implicit warning to NCP and Congress?

 While Chief Minister Uddhav Thackeray was speaking at a function in Aurangabad, the statement made by the Chief Minister that if Aji and Maji come together, they will become future colleagues, has sparked discussion everywhere.  Devendra Padnavis from BJP has welcomed the statement of the Chief Minister about this.  Devendra Fadnavis, the Leader of the Opposition, is beginning to feel that the BJP Sena can come together in the future.

 The present Mahavikas Aghadi government is a three-party government with different ideologies.  The Shiv Sena NCP and the Congress are running the Mahavikas Aghadi government together only to achieve political ends.  In addition, when Chief Minister Uddhav Thackeray was in Aurangabad today for the Marathwada Muktisangram Day program, he came together while speaking at the program.

 It is being said in political circles that Shiv Sena and BJP will come together in future. Anything is possible in politics.  This is an example of the Mahavikas Aghadi government in the state.  Therefore, if Sena and BJP come together again, there is nothing new in it. But when will this possibility happen if Uddhav Thackeray remains the Chief Minister for the next three years. But will BJP be ready for this?  Due to which Shiv Sena left BJP and joined hands with NCP and Congress and took the steering wheel of Mahavikas Aghadi government. Will it be possible if it goes with BJP again?  If the BJP takes a step back, it is possible.

 But when Chief Minister Uddhav Thackeray is making such a statement while the Mahavikas Aghadi government is running smoothly, it does not mean that everything is fine in the Mahavikas Aghadi government.  If you bother me, I can go with the BJP. Maybe that's what the Chief Minister wants to say.  This is also seen in this place.
Previous
Next Post »