मोदीजीच्या 15 लाख देण्याच्या खोट्या आश्वासनाचा बसला बँकेला फटका

मोदीजीच्या 15 लाख रुपयाच्या फसव्या आश्वासनाचा आजही होतोय लोकांवर परिणाम :
अलीकडेच एक घटना समोर आली आहे. बिहार मधील एका व्यक्तीच्या बँक खात्यात 5 लाख 50 हजार रुपये जमा झाले. एवढ्या रक्कमेचा मेसेज त्या व्यक्तीच्या मोबाईल वर आल्यानंतर त्याला असं वाटलं की मोदीजींनी 15 लाख रुपये प्रत्येक व्यक्तीला देण्याची घोषणा केली होती. त्याचीच ही रक्कम पहिला हप्ता म्हणून मला मिळाली आहे.असं त्याला वाटलं. मिळालेली साडेपाच लाख रुपयाची रक्कम त्या व्यक्तीने खर्चूनही टाकली आहे.

मोदीजींनी खरच त्याव्यक्तीच्या बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा केलेत का? काय आहे सत्यता जाणून घेऊ या.गेल्या वर्षी मार्च महिन्यात बँकेच्या चुकीमुळे नजर चुकीने सदरील रक्कम दक्षिण बिहारच्या बख्तियार गवातील रणजित दास नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली होती. परंतु जेव्हा ही बाब बँकेच्या लक्षात आली तेंव्हा बँकेने अनेक वेळा त्या व्यक्तीला रक्कम परत करण्यासाठी संपर्क केला परंतु मोदींनी मला हे पैसे दिलेत असे सांगून त्याने साडेपाच लाख रुपये परत देण्यास नकार दिला.

 बँकेकडून अनेक वेळा त्याला नोटीसही पाठवण्यात आल्या मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. बँकेने त्यावर दबाव ठाकून काही रक्कम परत मिळवली. परंतु उरलेली 1लाख 60 हजार रुपये रक्कम देण्यास नकार दिल्याने शेवटी बँक व्यवस्थापकाने रणजित दास या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार मंगळवारी त्याला मानसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात केले असता त्याला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 मोदीजींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकी आधी प्रचारादरम्यान विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर 15 लाख रुपये जमा केले जातील अशी फसवी घोषणा केली होती. परंतु लोक मोदीजीच्या फसव्या घोषणेच्या आशेवर विश्वास ठेवत असल्याचे आजही दिसून येत आहे.याचच हे उदाहरणं आहे.म्हणून राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या घोषणा आणि आश्वासने सर्व काही खोटे आणि फसवे असतात. हे जनतेने या ठिकाणी समजून घ्यावे.जेणेकरून रणजित दास सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही.
Modiji's fraudulent promise of Rs 15 lakh still affects people today:

 An incident has come to light recently.  5 lakh 50 thousand was deposited in the bank account of a person in Bihar.  After receiving a message of this amount on the person's mobile, he thought that Modiji had announced to give Rs 15 lakh to each person.  That's what I got as the first installment, he thought.  The person has also spent the amount of Rs.

 Did Modiji really deposit Rs 5.5 lakh in that person's bank account?  Let's find out the truth. In March last year, due to a bank mistake, the money was mistakenly deposited in the account of a person named Ranjit Das in Bakhtiyar district of Bihar.  But when the matter came to the notice of the bank, the bank contacted the person several times to refund the amount but Modi refused to refund the Rs.

 He was also sent several notices by the bank but to no avail.  The bank pressured him to get some money back.  However, the bank manager had finally lodged a complaint against Ranjit Das for refusing to pay the remaining Rs 1 lakh 60 thousand. He was arrested by the Mansi police on Tuesday and remanded in custody for 14 days.

 During the campaign ahead of the 2014 Lok Sabha elections, Modiji had fraudulently announced that Rs 15 lakh would be deposited in the bank accounts of every citizen by bringing black money from abroad to India.  But even today, people seem to believe in the hopes of Modiji's deceptive declarations. These are just a few examples. So the declarations and promises made by political parties to win elections are all false and deceptive.  The people should understand this in this place so that a situation like Ranjit Das will not arise.
Previous
Next Post »