महागाईच्या विरोधात अण्णा हजारे जन आंदोलन करणार का?

वाढत्या महागाईच्या विरोधात अण्णा हजारे उपोषण करणार काय?
सध्या देशात व राज्यात डिझेल पेट्रोल आणि घरगुती गॅस च्या किंमत भरमसाठ वाढत चालल्या आहेत. डिझेलने शंभरी गाठली तर पेट्रोलने शंभरी पार केली. घरगुती गॅस एक हजर रुपये पर्यंत पोहचला आहे.खाद्य तेलाच्या किंमती दीडसे रुपयेच्या वरी गेल्या आहेत.सर्वसामान्य जनतेच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट झाला आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. लोकपालसाठी आंदोलन करणारे अण्णा हजारे जनतेच्या या मूलभूत प्रश्नावर मोदी सरकारच्या विरोधात जन आंदोलन उभं करणार का? महागाई मुळे जनतेची आर्थिक पिलवणूक होत असताना अण्णा हजारे का बघ्याची भूमिका घेत आहेत.

अण्णा हजारे खरोखरच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारे आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाढत्या महागाईच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात का आंदोलन करत नाहीत. ह्या देशातील जनतेच्या समस्या नाहीत काय. देशव्यापी जन आंदोलनाचा लढा का उभा करत नाहीत.2014 च्या लोकसभा निवडणुकी आधी नरेंद्र मोदींनी देशा बाहेरील काळा पैसा देशात आणून नागरिकांच्या खात्यावर 15 लाख टाकण्याचं सांगितलं होतं. आता पर्यंत की काळा पैसा देशात आणला आणि किती लोकांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झाले या विषयी अण्णा हजारे मोदी सरकारला का विचारत नाहीत.

केंद्रात भाजपाला सत्तेत बसविण्यासाठीच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन केलं होतं का? अशी शंका निर्माण होते.महाराष्ट्रात सुद्धा भाजपाच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात एक ही भ्रष्टाचार झाला नाही का? तेव्हा सुद्धा तुम्ही कुठे लपून बसले होते माहित नाही.नेमका तुमच्या समाज सेवक असण्याचा कोणाला फायदा आणि कोणाला नुकसान हे जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे यापुढे अण्णा हजारे यांच्या आंदोलनास कोणीही किंमत देणार नाही. हे लक्षात आल्यामुळे आंदोलन करण्याचं धाडस करत नाहीत.स्वतःची लायकी आता कळून आली. नाही तर उठसुठ उपोषण केलं असतं युवा पिढीची डोके भडकावून त्यांचा आंदोलनासाठी वापर केला असता.

देशातील जनतेला आता कळून चुकलं आहे की अण्णा हजारे प्रयोजित आंदोलन करणारे आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन-उपोषण करणारे तथाकथित आंदोलन जिवी समाज सेवक आहेत.जर अण्णा हजारे खरच जनसेवक आहेत तर त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर वाढती बेरोजगारी आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे उपोषण करावं आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत उपोषण चालू ठेवून स्वतः ला सिद्ध करावं की मी समाज सेवक आहे म्हणून. नाही तर आंदोलन -उपोषणाची नौटंकी करू नये.

                  (  प्रायोजित आंदोलन जिवी )

Will Anna Hazare go on a hunger strike against rising inflation?

 Currently, the prices of diesel, petrol and domestic gas are skyrocketing in the country and the state.  Diesel crossed the hundred while petrol crossed the hundred.  Domestic gas has reached Rs.  Will Anna Hazare, who is agitating for Lokpal, launch a mass agitation against the Modi government on this fundamental question of the people?  Why Anna Hazare is taking the role of watching while the people are being financially exploited due to inflation.

 While Anna Hazare is really working for the common man, why not agitate against the Center and the state government on the issue of rising inflation on the issue of farmers.  Aren't there problems for the people of this country?  Why don't people across the country fight the agitation. Before the 2014 Lok Sabha elections, Narendra Modi had asked them to bring black money from outside the country and put Rs 15 lakh in the citizens' accounts.  So far, Anna Hazare has not asked the Modi government about how much black money was brought into the country and how many people got Rs 15 lakh in their accounts.

 Was the anti-corruption movement started to bring BJP to power at the Center?  Such doubts arise. Even in Maharashtra, during the five years of BJP rule, there was not a single corruption?  Even then, you do not know where you were hiding.  Therefore, no one will value Anna Hazare's movement anymore.  Realizing this, they do not dare to agitate.  Otherwise, they would have gone on a hunger strike and used the young generation for agitation.

 The people of the country have now come to know that Anna Hazare is a sponsored agitator.  If Anna Hazare is indeed a public servant, then he should go on a hunger strike in Delhi against the central government on the issue of rising unemployment and rising inflation on the issue of farmers.  Prove that I am a social worker.  If not, the agitation should not be a gimmick of fasting.
Previous
Next Post »