सध्या तरुणाईला भेडसावणारा एकच प्रश्न आहे तो म्हणजे नौकरी.
लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार नौकरीच्या संधीची वाट पहाता पहाता वय निघून चालय शिक्षण पूर्ण करून घरात बसण्याची वेळ आली नौकरीची संधी उपलब्ध नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध विभागात लाखोचा बॅकलॉग भरायचा बाकी आहे. त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय सरकार घेत नाही मग ते राज्य सरकार असू कि केंद्र सरकार. तरुणांच्या भविष्याचा विचार कोणतेच सरकार करत नाही.तरुणाईचा विचार केला जातो फक्त निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन झिंदाबाद मुर्दाबाद करण्यासाठी.कधी हिंदुत्वाच्या नावाखाली तर कधी गोहत्या च्या नावाखाली तर कधी लव जिहादच्या नावाखाली तरुणांची डोकी भडकावून जातीय दंगली पेटवण्यासाठी वापर करून घेतला जातो . निवडणुकी दरम्यान दारू मटण चिकन खाऊ पीऊ घालून आपला राजकीय स्वार्थ साधला जातो.परंतु तरुणांना नौकरी किंवा रोजगार मिळावा म्हणून आपल्या जिल्ह्यात,मतदार संघात कारखाने उद्योगधंदे निर्माण करत नाहीत.रोजगारच्या संधी निर्माण करून देत नाहीत देशाच्या एका थापाड्याने तर कहरच केला. दरवर्षी 2 कोटी लोकांना नौकरी देणार म्हणून बोंब ठोकली. खोट्या भुलथापांना देशातील तरुण बळी पडला आणि नौकरी मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या. पण पदरी काय पडलं तर फक्त निराशाच.रोजगार निर्माण करणं हे राज्य सरकार व केंद्र सरकार यांची जिमेदारी असते परंतु इथे तर आहेत ते रोजगार आणि नौकऱ्या संपविण्याचा घाट घातला जातोय. सरकारी क्षेत्रातील खाजगीकरनाला प्राधान्य देऊन सरकारी नौकऱ्या संपवून तरुणांना देशोधडीला लावण्याचं काम केलं जात आहे. आता तर कोरोना सुद्धा तरुणांईच्या मुळावर उठला आहे. गेली एक दीड वर्ष झालं कोरोना रोगाच्या भीतीचं बुजगावणं उभं केलं आहे. त्यामुळे राज्य आणि देशील टाळेबंदी केली जात आहे ज्याचा फटका रोजगाराला बसतोय. लाखो लोकांच्या नौकऱ्या गेल्या. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. याकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही. केवळ भावनिक आवाहने करून वेळमारून नेली जाते.कुठल्याही प्रकारचे रोजगार निर्मितीचे निश्चित धोरण ठरवल्या जातनाही.नौकरी पात्रता परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना नौकरी वर घेतल्या जातनाही त्यामुळे नैराश्य आलेले तरुण आत्महत्या करण्याचे पाऊल उचलतात लोकांचे जिव गेल्यानंतर सरकार ला जाग येते आणि खूपच जनतेचा कळवळा असल्यासारखं भासवून लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याची पुडी सोडतात आणि लोकांच्या भावनेशी खेळखेळतात.महाराष्ट्रात तर मागील पाच सात वर्षांपासून पोलीस भर्ती बाबत असाच खेळ चालू आहे फक्त घोषणा दहा हजार बारा हजार पदाची भर्ती करणार म्हणून. मागील सरकारने सुद्धा बारा हजार पोलीस पदभर्ती करणार असल्याची घोषणा केली होती पण केली नाही. आता ही राज्य सरकारने पोलीस भर्ती घेणार असल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात होईल तेव्हाच खरं.त्यामुळे दरवर्षी बेरोजगारी चा आलेख वाढतच चालला आहे.मुलांना नौकरी मिळेना म्हणून लग्नही जुळेना अशी तरुणांची अवस्था झाली.
At present, the only problem facing the youth is the job.
While millions of well-educated unemployed youth are waiting for job opportunities, it is time to go home and complete their education. There are no job opportunities available. There is a backlog of lakhs in various departments of the Central Government and the State Government. The government does not take any decision on it, be it the state government or the central government. No government thinks of the future of the youth. The youth is considered only to carry the flags of various political parties on their shoulders in elections to make Zindabad Murdabad. Sometimes in the name of Hindutva, sometimes in the name of cow slaughter and sometimes in the name of love jihad. During elections, our political interests are served by drinking alcohol, meat, chicken and drinking. But in our district, factories do not create industries for the youth to get jobs or employment. The bomb exploded as it would employ 2 crore people every year. Young people in the country fell prey to false pretenses and became so obsessed with getting jobs. But what happens is just frustration. It is the responsibility of the state government and the central government to create jobs, but there is a plan to end the jobs and jobs that are here. Priority is being given to privatization in the government sector and work is being done to deport the youth by ending government jobs. Now even Corona has risen to the roots of youth. For the last one and a half years, the fear of corona disease has been on the rise. Therefore, the state and the country are being locked up, which is affecting employment. Millions lost their jobs. It was a time of famine. The government does not pay much attention to this. Only emotional appeals are used to kill time. No definite policy is created for any kind of job creation. Candidates who pass the job qualification test are not hired, so frustrated youth take steps to commit suicide. In Maharashtra, the same game has been going on for the last five to seven years with the announcement that ten thousand twelve thousand posts will be filled. The previous government had also announced that it would recruit 12,000 policemen but did not do so. Now the state government has announced that it will recruit police. But only when it actually happens. Therefore, the graph of unemployment is increasing every year.
There was a situation where young people could not get married because they could not find a job.
ConversionConversion EmoticonEmoticon