लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती 1 ऑगस्ट रोजी  संपूर्ण महाराष्ट्रात व देशात साजरी करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे मिरवणूक न काढता स्थानिक पातळीवर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी ठीक ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांचा जीवन संघर्ष :
महाराष्ट्रातील  सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग समाजातील गरीब कुटुंबात अण्णाभाऊचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला. त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे पण ते अण्णाभाऊ या टोपण नावाने परिचित होते.गरिबी आणि दारिद्र्य हे जन्मापासूनचं त्यांच्या नशिबी आले होते त्यामुळे शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे दुरापास्त होते.गावात कुटुंबाची गुजराण होत नसल्यामुळे कामाच्या शोधात अण्णाभाऊच कुटुंब मुंबईला आलं. गिरणी मधे झाडूवाल्यापासून ते कोळसा वेचन्या पर्यन्तची मिळेल ती काम केली.खाणीतले दगड देखील फोडण्याचं काम अण्णाभाऊनी केलं 
अण्णाभाऊ साठे कामगारांचा बुलंद आवाज :
महाराष्ट्रातील कष्टकरी कामगारांच्या व्यथा काय आहेत हे स्वतः अण्णाभाऊनी अनुभवल्या आहेत. कामगार वर्गाचे जीवन किती हलाकीचे असते याचे चटके अण्णाभाऊनी स्वतः अनुभवले आहेत.कामगारांच्या हक्कासाठी ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले.कामगार चळवळीत काम करत असताना कम्युनिस्टांशी जोडले गेले. कामगार आंदोलने उभी केली कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहिले. संयुक्त महाराष्टाच्या लढ्यात त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. कामगारांची बाजू मांडताना ते म्हणतात पृथवी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकरी कामगाराच्या तळ हातावर तरली आहे.1947 ला देश स्वतंत्र झाला तेंव्हा अण्णाभाऊ म्हणतात एह आजादी झुटी है ;देशकी जनता भुकी है.अशाप्रकारची प्रखड भूमिका त्यांनी मांडली.कम्युनिस्टाचा पगडा असलेले अण्णाभाऊ शेवटी डॉ बाबासाहेबांच्या विचाराकडे वळले आणि "जग बदल घालुनी घाव ;मज सांगून गेले भिमराव " हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा उपदेश त्यांच्या अनुयायांना देऊन गेले.
अण्णाभाऊ साठे ग्रामीण साहित्याची खाण :
अण्णाभाऊ हे एक नाटककार, पटकथा लेखक, कादंबरीकार, लोकगीतकार, पोवाडा लेखक,शाहीर अशा अनेक भूमिका त्यांनी पारपाडल्या. शेतकरी कष्ट करीवर्गाचे जीवन किती हलाकीचे असते हे लोकगीताच्या माध्यमातून लावणीच्या, पोवाड्याच्या माध्यमातून हुबेहूब चित्र रंगवून त्यांच्या यातना जगासमोर मांडल्या. आपल्या लेखणीच्या रूपाने लोक कलेला मोठ स्थान मिळवून दिलं. "माझी मयना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली "हे गीत खूप गाजलेलं आहे. अण्णाभाऊनी एकंदरीत 21 कथा संग्रह आणि 35 कादंबऱ्या लिहिल्या त्यातली फकिरा ही कादंबरी फार गाजली.
अण्णाभाऊंच्या लेखणाने महाराष्ट्राच्या ग्रामीण साहित्याला नवी ओळख निर्माण करून दिली.शाळेत न शिकलेले अण्णाभाऊ परिस्थितीशी झुंजतांना केवळ अक्षर ओळख शिकलेले अण्णाभाऊ जिद्द,चिकाटी, बुद्धी व लेखणीच्या जोरावर लोकशाहीर साहित्य सम्राट झाले.अशा प्रकारचं अष्टपैलू लिखाण म्हणजे अण्णाभाऊ साठे ग्रामीण साहित्याची खाणचं आहे.
English translation :

The 101st birth anniversary of Lokshahir Annabhau Sathe was celebrated on 1st August all over Maharashtra and the country.  Annabhau Sathe was greeted at the right place on his birthday at the local level without taking out a procession due to Corona restrictions.
 Annabhau Sathe's life struggle:

 Annabhau was born on August 1, 1920 in the village of Vategaon in Valva taluka of Sangli district in Maharashtra to a poor family from the untouchable Mang community.  His original name was Tukaram Bhaurao Sathe but he was known by the nickname Annabhau. Poverty and destitution were his destiny from birth, so going to school was a long way off. The Annabhau family came to Mumbai in search of work.  He worked from sweeping the mill to selling coal. Annabhau also worked in quarrying.

 Annabhau Sathe the loud voice of workers:

 Annabhau himself has experienced the plight of hardworking workers in Maharashtra.  Annabhau himself has experienced the hardships of working class life. He has been imprisoned many times for his workers' rights. He was associated with the Communists while working in the labor movement.  The workers' movement continued to fight for the right to justice of the workers.  He was heavily involved in the struggle for a united Maharashtra.  Speaking on behalf of the workers, he said that the earth has not floated on the heads of the rest of the world but on the hands of the hard working people.  And Dr. Babasaheb Ambedkar's advice to follow the thoughts of Dr. Babasaheb Ambedkar was to change the world.

 Mine of Annabhau Sathe Rural Literature:

 Annabhau is a playwright, screenwriter, novelist, folklorist, Povada writer, Shahir.  The peasantry presented to the world how miserable the life of the working class is by painting a vivid picture of their suffering through folk songs and planting.  In the form of his writing, people gave art a big place.  The song "My body remained in the village, my life was lost" is very popular.  Annabhau wrote a collection of 21 short stories and 35 novels, of which Faqira was the most populor 

Annabhau's writings gave a new identity to the rural literature of Maharashtra. Annabhau, who did not learn in school, struggled with the situation.


Previous
Next Post »