पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांच्यावर जातीयवाद्याकडून प्राणघातक हल्ला

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांच्यावर दि 30 जुलै रोजी रात्री जातीयवादी गावगुंडाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दिपक केदार हे पालम,गंगाखेड आणि माजलगाव असा दौरा करून सेलू शहरात रात्री 10 वा.पोहचले. शहरातील हॉटेल गोविंदा येथे थांबले होते. काहीतरी खावे म्हणून ते गाडी घेऊन हॉटेल पंजाबी च्या दिशेने निघाले होते.दरम्यान रायगड कॉर्नर येथे आधीच दबा धरून बसलेल्या जातीयवादी गावगुंडानी अचानक त्यांच्या गाडीसमोर येऊन गाडी थांबवली आणि साथीदारांना या या म्हणून बोलवत असताना एकाने गाडीवर दगड मारला गाडीचा काच फुटून गाडी चालवणारे जिल्हाध्यक्ष गोटे यांच्या डोक्याला दगड लागला तरी जखमी अवस्थेत गोटे यांनी तिथून गाडी वेगाने पळवून एका गावात पोहचेल आणि त्यागावातील आंबेडकर वस्तीत घडला प्रकार समाज बांधवाना सांगितला त्या नंतर पोलीस अधीक्षक यांना घटनेची माहिती दिल्या नंतर सेलू पोलीस ठाण्याच्या गाडीत सेलूला येत असताना पोलिसांची सुद्धा गाडी अडवण्याचा प्रयत्न हे जातीयवादी गावगुंड करत होते. पोलिसांना देखील घाबरत नव्हते. काही दिवसापूर्वी सेलू तालुक्यातील खेर्डा या गावी बौद्ध समाजाच्या महिलेला तेथील जातीयवादी सरपंचांने जातीवाचक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी विविध आंबेडकरी संघटना व पक्ष यांनी त्या सरपंचाला ऍट्रॉसिटी कायद्याखाली अटक करून कडक कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यातच पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार हे देखील खेर्डा या गावी एक दोन वेळा येऊन पीडित बौद्ध महिलेला न्याय मिळावा म्हणून पोलीस प्रशासनाला कार्यवाहीची मागणी करत होते.याचाच राग मनात धरून दिपक केदार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे . दिपक केदार हे सेलूला येणार असल्याची माहिती जातीयवाद्यांना असल्यामुळे हल्ल्याचा नियोजित कट होता. या वरून महाराष्ट्रातील बौद्ध समाज किती सुरक्षित आहे हे समजते.
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आंबेडकरी नेत्यांना संपविण्याचा जातीयवाद्यांचा डाव :
बौद्ध समाजावर किंवा बहुजन समाजातील कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर आंबेडकरी संघटना व पक्षांचे नेते  अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वात आधी पुढाकार घेतात. शासन व पोलीस प्रशासन यांना धारेवर धरून बहुजन समाजातील पीडिताना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. जिथे कुठे समाजावर अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जातात. अन्यायाविरोध लढण्याचा आंबेडकरी बाना विरोधकांना सहन होतं नाही. म्हणून आंबेडकरी नेत्यांना लक्ष करून त्यांच्या वर हल्ले केले जातात त्यांना घाबरवून संघटना व नेत्यांना संपविण्याचा मनुवाद्यांचा  प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी जातीवादला खतपाणी घालणाऱ्या संघटना राज्यात सक्रिय झाल्या आहेत. दिपक केदार यांच्यावर जातीयवादी गावागुंडा कडून झालेला प्राणघातक हल्ला म्हणजे आंबेडकरी नेत्यांना संपविण्याचा मनुवाद्यांचा डाव आहे हेच या ठिकाणी सिद्ध होते.
English translation :

Panther Sena chief Deepak Kedar was attacked by racist gangsters in Selu in Parbhani district on the night of July 30.  Deepak Kedar visited Palam, Gangakhed and Majalgaon and reached Selu at 10 pm.  Stopped at Hotel Govinda in the city.  He was on his way to Hotel Punjabi to have something to eat when a racist gangster, who was already huddled at Raigad Corner, suddenly stopped in front of his vehicle and while shouting at his accomplices, one of them threw stones at the vehicle.  However, Gote rushed to a village in a critical condition and informed the community about the incident in Ambedkar area of ​village. After informing the Superintendent of Police, he informed the Superintendent of Police about the incident.  Was not.  A few days back, a woman belonging to the Buddhist community in Kherda village in Selu taluka was insulted by the casteist sarpanch in a racist language.  Various Ambedkarite organizations and parties had demanded the arrest of the sarpanch under the Atrocities Act.  In addition, Panther Sena president Deepak Kedar also visited Kherda once or twice and demanded action from the police administration to get justice for the victim Buddhist woman.  The attack was planned as the racists knew that Deepak Kedar would be coming to Sailu.  From this one understands how safe the Buddhist community in Maharashtra is.

 Ethnicists plot to eliminate Ambedkarite leaders fighting against injustice:

 If injustice is inflicted on the Buddhist community or anyone in the Bahujan community, then the leaders of Ambedkarite organizations and parties take the first step to fight against the injustice.  Bahujan works to bring justice to the victims of the society by keeping the government and the police administration on edge.  Wherever there is injustice in the society, they run to their aid night after night.  Ambedkar's ban on fighting injustice is not tolerated by the opposition.  Therefore, the Ambedkarite leaders are being targeted and attacked.  For this, organizations that fertilize casteism have become active in the state.  The assassination attempt on Deepak Kedar by a racist gangster was a ploy by the Manuvadis to eliminate the Ambedkarite leaders.




Previous
Next Post »