Aurangabad Murder cases : औरंगाबादमध्ये आणखी दोन खुनाच्या घटनांनी माजली खळबळ

Murder case : औरंगाबाद मध्ये रविवारी दोन खुनाच्या घटना घडल्याने खळबळ 
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. रविवारी 5 जून रोजी आणखी दोन खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.शहरातील बेगमपुरा परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृत देह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तर दुसरीकडे चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा डोक्यात वरवंटा मारून खून केल्याची घटना सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

हिमायतबाग परिसरात लच्छू पैलवान यांच्या शेताजवळील डोंगर पायथ्याशी जळालेल्या अवस्थेत व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली आहे.घटनेच्या प्रार्थमिक माहितीनुसार हा खुनाचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले असून खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत देह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

घटनास्थळाला पोलीस उपयुक्त उज्वला वनकर यांच्यासाह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहाणी केली.त्यानंतर मृत देह उत्तरीय तपासणी साठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.मृत व्यक्ती जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे.

दुसऱ्या खुनाच्या घटनेत सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर येथे मीना मच्छिन्द्र पिटेकर (वय 50 ) या महिलेचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.चारित्र्याच्या संशयावरून पती मच्छिन्द्र यानेच पत्नी मीना यांच्या डोक्यात वरवंटा मारल्याने मीना यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मुलगी शिवकन्या सिंह हिने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Previous
Next Post »