छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्प राबविण्यासाठी बीआरएसपी औरंगाबाद जिल्हा युनिटच्यावतीने प्रधानमंत्री यांना निवेदन


बीआरएसपी औरंगाबाद जिल्हा युनिटच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन 
औरंगाबाद : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 6 मे 2022 ते 6 मे 2023 या स्मृतीशताब्दी वर्षात विविध प्रकल्प योजना राबविण्याकरिता बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ. सुरेश माने यांच्या आदेशानुसार दि.1 जून 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन देण्याच्या राज्यव्यापी कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष 6 मे 2022 ते 6 मे 2023 या कालावधी मध्ये केंद्र सरकारद्वारा (1) 100 करोड रुपयांची बजेट मध्ये तरतूद करून विविध प्रकल्प राबविण्यात यावेत (2)शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात कुठेही एम्सच्या धर्तीवर सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरची निर्मिती करावी (3)केंद्र सरकारद्वारा महाराष्टात किंवा देशात कुठेही आय आय टी व आय आय एमच्या स्तरावरील उच्च शिक्षण संस्थेची स्थापना करावी,(4) शाहू महाराजांचे शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व योगदान असल्यामुळे त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले होते. याची आठवण ठेवत केंद्र सरकारने विदेशात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना राजर्षी शशू महाराज शिष्यवृती -100" अंतर्गत नवी योजना लागू करून प्रतीवर्षी बजेट मध्ये आर्थिक तरतूद करावी,(5)शेती क्षेत्रात शाहू महाराज यांचे योगदान लक्षात घेऊन शाहू महाराज किसान सम्मान योजना लागू करून 60 वर्षापुढील शेतकऱ्यांना 5 हजार रुपये मासिक पेंशन योजना सुरु करावी (6) केंद्र सरकारद्वारा देशातील प्रत्येक राज्यात 100 हॉस्टेल्स, ग्रामीण भागातील अति मागास भागात 50 हॉस्टेल्स निर्मिती करून त्यासाठी प्रतीवर्ष बजेट मध्ये तरतूद करावी. अशा विविध मगाण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, अब्दुल अजीज (वरिष्ठ नेता ),विजय शिनगारे (जिल्हा उपाध्यक्ष ),सय्यद नुसरत (जिल्हा महासचिव ),सय्यद निसार (शहराध्यक्ष ),शेख शमशाद ( वॉर्ड अध्यक्ष पडेगाव )नानासाहेब महांकाळे (बीआरएसपी कार्यकता ) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous
Next Post »