धुळ्यात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या युवकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कार्यवाही

धुळ्यात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक 
धुळे : धुळे तालुक्यातील नवलनगर येथे गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch )अटक केली आहे.याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव विठ्ठल आत्माराम महाजन (रा.विखरण ) असे असून याप्रकरणी दोन व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की विठ्ठल आत्माराम महाजन हा तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एक पथक तयार करून विठ्ठल महाजन याची तपासणी करण्यासाठी पाठवले.पथक विठ्ठल महाजनचा शोध घेत त्याच्या पर्यंत पोहचले.पोलीस त्याची चौकशी करत होते मात्र तो उडवा उडवीची उत्तरे देत होता.

त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला. त्याची अंग झाडती घेतली असता कंबरेला बांधलेला एक गावठी पिस्तूल आढळून आला.हा गावठी कट्टा त्याने संजय सायमल पावरा (रा.भिलटपाडा आंबा ता. शिरूपूर ) याच्याकडून विकत घेतला असल्याची कबुली दिली आहे. 25 हजारांचा गावठी पिस्तूल, 2 हजारांची जिवंत काडतूस आणि एक दुचाकी (क्र एमएच 18 एएच 7421) असा एकूण 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी (ता.30 ) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुकटी (ता.धुळे ) येथून एकाला गावठी पिस्तूलसह अटक केली. त्यानंतर विठ्ठल महाजन आणि संजय पावरा या दोघांची नावे चर्चेत आली होती. पोलिसांनी विठ्ठल महाजन व संजय पावरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाही पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली 'एलसीबी'चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,प्रकाश पाटील,संदीप सरग,प्रकाश सोनार,संतोष हिरे,पंकज खैरमोडे,सागर शिर्के,योगेश जगताप,किशोर पाटील,महेंद्र सकपाळ,गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली आहे.
Previous
Next Post »