डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक उभारणीसाठी नागपूरात बीआरएसपीचा एल्गार

डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक उभारणी साठी बीआरएसपीचे धरणे आंदोन 
नागपूर : नागपूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक उभारणी साठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने धरणे -प्रदर्शन करण्यात आले. शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक उभारणीसाठी नागपूर महापालिकेने 1992 मध्ये ठराव संमत केला होता. महापालिकेने ठराव घेऊन आज 30 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनही डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारक उभे राहिले नाही.

नागपूर महापालिकेची डॉ बाबासाहेब आंबेडकर शताब्दी स्मारका प्रती असलेली उदासीनता आणि ढिसाळ कारभार याचा निषेध करण्यासाठी आणि लवकरात लवकर स्मारक उभारणी करावी यासाठी दि 10 जून 2022 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान संविधान चौक येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) नागपूर शहराच्यावतीने धरणे निदर्शन करण्यात आले.

विदर्भ प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे,संयोजक डॉ जे बी रामटेके, प्रदेश महासचिव रमेश पाटील, प्रदेश महिला आघाडी संयोजिक विश्रांतीताई झांबरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश, जिल्हा, शहर व विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.आंदोलना दरम्यान एस टी पाझरे,सीटी बोरकर,पंजाबराव मेश्राम,ऍड भीमराव शेंडे,वंदना लांजेवर,सीडी वाघमारे,विलास पारखंडे, शोभाताई तिरपुडे यांची भाषणे झाली.त्यानंतर विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष आशीर्वाद कापसे यांनी केले तर  जिल्हाध्यक्ष विनोद रंगारी यांनी आभार व्यक्त केले.या आंदोलनात मायाताई मेश्राम,यशोधरा नानवटे,दिलीप पाझारे,ऍड. विलास गणवीर,तुलसीदास मंडपे,लिनता लाले,मोरध्वज आढाव,चंद्रप्रकाश लोणारे,किशोर सोमकुवर,कमलकिशोर,डॉ आर पी ढाबरे, टी.एल कोचे, वयोवृद्ध महिला कार्यकर्त्या शिंगाडे, प्रवीण खापर्डे तसेच गोधनी व जयभिम नगर प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Previous
Next Post »