नवनीत राणा अटक होण्यापूर्वी हिंदू होत्या तर, अटक झाल्यास दलित झाल्या

नवनीत राणा हिंदू आहेत की दलित, दलित असतील तर त्यांनी दलितांसाठी काय काम केलं?
मुंबई : नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे की,  मी दलित असल्यामुळे मला पोलिसांनी पाणी दिले नही आणि वॉशरूमला जाऊ दिले नही. राणा यांच्या तक्रारीवरून लोकसभा सचिवालयाकडून राज्य सरकारकारला याबाबत 24 तासाच उत्तर देण्याचे सांगितले आहे.एखादाद्या लोकप्रतिनिधी सोबत तसे वर्तन झाले असेल तर त्याची लोकसभा सचिवालय किंवा विधानसभा सचिवालय तात्काळ दखल घेते.

परंतु नवनीत राणांनी जी तक्रार केली त्यामध्ये तथ्य किती? अटक होण्यापूर्वी तर त्या कट्टर हिंदू होत्या आणि अटक होताच दलित झाल्या. जेंव्हा सत्तेचा उपभोग घ्यायचा असतो तेंव्हा हिंदू म्हणून भूमिका घ्यायची आणि जिथे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यास स्वतःला वाचवण्यासाठी संविधानिक आधार घ्यायचा. आपण दलित, मागासवर्गीय असल्यामुळेच अन्याय, अत्याचार होत आहे अशी ओरड करायची.

  नवनीत राणा नकली आणि ढोंगी दलित आहेत .मुळात नवनीत राणा ह्या नकली दलित असल्याचे कायद्यानेच ठरवले आहे.त्यांनी दलित असल्याचे जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन लोकसभेची निवडणूक जिंकली होती.परंतु न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून त्या दलित नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.असे असताना त्यांचे खासदार म्हणून असलेलं सदस्यत्व केंद्र सरकारने रद्द केलं नाही. कारण नवनीत राणा या भाजपा समर्थक आहेत.

 नवनीत राणा यांनी एससी राखीव मतदार संघातून निवडून आल्या आहेत. तर त्यांनी दलित मागासवर्गीयांचे प्रश्न लोकसभेत मांडायला पाहिजेत. दलित मागासवर्गीयांच्या हिताची बाजू लोकसभेत मांडायला पाहिजे होती. मात्र त्याबाबती कधीही लोकसभेत किंवा राज्य सरकार समोर बोलताना दिसल्या नाहीत.

मुळात त्या दलित नाहीत त्यामुळे दलित मागासवर्गीयांच्या प्रश्नावर न बोलता हनुमान चालीसा वाचन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवास्थानी जायचा हट्ट धरतात . जर हनुमान चालीसा वाचन करून मतदार संघाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होत असेल तर राणा दाम्पत्यांनी 2024 पर्यंत फक्त हनुमान चालीसा वाचनाचाच कार्यक्रम हाती घ्यावा.परंतु आपण दलित मागासवर्गीय असल्यामुळेच पोलीस पाणी देत नाही असा नकली दलित, मागासवर्गीय पणा अजिबात दाखवू नये.
                                                 
                                                   संपादकीय....
Previous
Next Post »