अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस 5 वर्ष सश्रम करावासासह 6 हजार रुपये दांडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला भेटण्याचा आणि लग्नासाठी तगादा लावणाऱ्या अक्षय युवराज गायकवाड (वय 22. रा. उस्मानपुरा ) या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करत तिचा विनय भंग केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस निंबाळकर यांनी 5 वर्ष सश्रम करावास तसेच पोक्सोसह अन्य विविध कलमाअंतर्गत 6 हजार रुपये दांडाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी पीडितेला नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी निकालाची प्रत जिल्हा विधी प्राधिकरणाकडे पाठवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. वरील प्रकरणाबाबत 17 वर्षीय मुलीने तक्रार दिली होती की या प्रकरणातील आरोपी बऱ्याच दिवसापासून तिचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी दारू पिऊन तिच्या घरासमोर आरडा ओरडा करायचा. हा तरुण गुंड प्रवृतीचा असल्याने मुलीच्या आई वडिलांनी अगोदर पोलिसात तक्रार देण्यास टाळाटाळ केली होती.
त्यानंतर आरोपीने मुलीच्या भावाला अडवून तूझ्या बहिणीला माझ्यासोबत लग्न करायला सांग नाहीतर तुला जिवे मारीन, 'अशी धमकी देखील दिली होती.आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 30 मार्च 2019 रोजी दुपारी घरात घुसून अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना घडली होती.
ConversionConversion EmoticonEmoticon