देशपातळीवर भाजपा विरोधात सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घेणार पुढाकार
देशपातळीवर भाजपा विरोधात आघाडी निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न होतं असताना आपण पहिले आहे. मागील 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी असाच प्रयत्न केला परंतु त्याला म्हणा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शरद पवारांनी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जीचे पुन्हा बहुमताने सरकार अस्तित्वात आल्यानंतर मागील महिन्यात त्या महाराष्ट्रात येऊन गेल्या.राष्ट्रीय पातळीवर भाजपा विरोधात आघाडी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून गेल्या नंतर आता तेलंगाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देखील भाजपा विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महाराष्टात येणार आहेत. तसेच ते पश्चिम बंगाल ला जाऊन ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी देखील तेलंगणाला येणार असल्याचे सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांनी डोसा खायची ईच्छा व्यक्त केली आहे. त्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यांना वेलकम असं उत्तर दिलं आहे. मात्र भाजप विरोधी देशपातळीवर खरोखरचं आघाडी निर्माण होणार आहे का किंवा या नेत्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येणार आहे हे येत्या काळात दिसून येईल.परंतु भाजपाची शेतकरी विरोधी भूमिका, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, आणि केंद्रीय संस्थांचा जसे सीबीआय ईडी यांचा दुरुपयोग केंद्रातील भाजपा सरकार करत आहे आणि भाजपा विरोधातील पक्षांच्या नेत्यांना सीबीआय आणि ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. त्यामुळे देशातील भाजपा विरोधातील पक्ष राष्ट्रीय पातळीवर सक्षम आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon